ईश्वराकडून थेट चैतन्य आणि मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !
४ नोव्हेंबर आणि त्यानंतर प्रत्येक रविवारी दैवी बालकांची वैशिष्ट्ये सांगणारी नवीन लेखमाला…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. सध्याच्या मानवांत सात्त्विकतेचे प्रमाण अत्यल्प असल्याने त्यांच्यात हे राज्य चालवण्याची क्षमता नाही; म्हणून ईश्वराने उच्च लोकांतून काही सहस्र दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. ही दैवी बालके उपजतच सात्त्विक असल्यामुळे त्यांच्यामध्ये ईश्वराकडून थेट चैतन्य आणि मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता आहे. या दैवी बालकांतील शिकण्याची वृत्ती, वैचारिक प्रगल्भता, त्यांच्यात उत्तम शिष्याचे अनेक गुण असणे, श्री गुरूंचे आज्ञापालन त्वरित करणे, त्यांना येणार्या अनुभूती आणि त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता यांतून ‘ही दैवी बालकेच ईश्वरी राज्य चालवू शकतील’, हे लक्षात येईल. त्यांच्या सहवासात असतांना, त्यांना पाहिल्यावर किंवा त्यांचे बोलणे ऐकल्यावर ऐकणार्या साधकांचा भाव जागृत होतो. त्यांच्याकडून आनंद आणि चैतन्य यांचे प्रक्षेपण होत असते. सर्व वाचकांना हे शिकण्यासाठी ४.११.२०२१ पासून प्रत्येक रविवार दैवी बालकांची लेखमाला चालू करण्यात येणार आहे.