त्रिपुरामध्ये मशिदीला आग लावण्यात आल्याच्या अफवेनंतर धर्मांधांकडून महाकाली मंदिराची तोडफोड !

काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस प्रणीत विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून अभाविपच्या कार्यकर्त्यावर आक्रमण !

  • मशिदीला आग लावण्यात आल्याच्या केवळ अफवेवरून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे केली जातात, तर मंदिरांवर आक्रमणे होऊनही हिंदू वैध मार्गानेही विरोध करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक
  • त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होणे, हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक
  • ‘त्रिपुरामध्ये माझ्या मुसलमान बांधवांवर अमानुष अत्याचार होत आहेत’, असे  म्हणणारे राहुल गांधी आता कुठे आहेत ? त्यांना आता त्यांच्या हिंदु बांधवांवर होणारे अत्याचार दिसत नाहीत का ?- संपादक
त्रिपुरामध्ये धर्मांधांकडून महाकाली मंदिराची तोडफोड

उनाकोटी (त्रिपुरा) – येथे शुक्रवार, २९ ऑक्टोबर या दिवशी कैलाशहर भागातील महाकाली मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मूर्तीची तोडफोड केली, तसेच मंदिराचीही हानी केली. ‘जमावाने येथील एका मशिदीला आग लावली’, हा अफवेनंतर धर्मांधांनी ही तोडफोड केली. दुसर्‍या एका घटनेत अखिल भारतीय विद्यार्थी परिदेचे पदाधिकारी शिवाजी सेनगुप्ता यांच्यावर काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटना एन्.एस्.यू.आय., तसेच तृणमूल काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटना तृणमूल छात्र परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केले. यात सेनगुप्ता घायाळ झाले. शुक्रवारी राज्यातील १ सहस्र १०० मशिदींमध्ये मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात चिथावणी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासूनच प्रशासनाने या भागात कलम १४४ लागू करून जमावबंदी केली आहे. (जमावबंदी असतांना धर्मांध अशा प्रकारचा हिंसाचार कसे करू धजावतात ? पोलीस या वेळी कुठे होते ? जमावबंदी असूनही अशी घटना घडणार असेल, तर हिंदूंनी कर भरून पोलिसांना पोसायचे तरी कशाला ? – संपादक)

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक