साधकांवर चैतन्याची उधळण करणारा एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू. (सौ.) योया सिरियाक वाले (वय ४१ वर्षे) यांचा ‘संत सन्मान’ सोहळा !
रामनाथी, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या आध्यात्मिक संशोधन केंद्रात वास्तव्य करणारे ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे (एस्.एस्.आर्.एफ्.चे) ५ साधक पुढील १-२ दिवसांत विदेशात जाणार आहेत. त्यामुळे एस्.एस्.आर्.एफ्.च्या सर्व विदेशी साधकांसाठी ३० ऑक्टोबरला सकाळी एका सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगात फ्रान्स येथील आणि सध्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या आध्यात्मिक संशोधन केंद्रात वास्तव्य करणारी कु. अनास्तासिया सिरियाक वाले (वय १७ वर्षे) हिने ६१ टक्के व्यष्टी आध्यात्मिक पातळी गाठल्याचे तिचे मामा पू. देयान ग्लेश्चिच यांनी घोषित केले. त्यानंतर सौ. योया सिरियाक वाले यांनी संतपद गाठल्याचे घोषित केले. विदेशात अध्यात्मप्रसार करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले हे पू. (सौ.) योया वाले यांचे पती आहेत.
सद्गुरु सिरियाक वाले यांनी त्यांची पत्नी पू. (सौ.) योया वाले आणि कन्या कु. अनास्तासिया यांच्याविषयी व्यक्त केलेले मनोगत !
- ‘सूक्ष्मचित्रे काढणे हा पू. (सौ.) योया यांचा साधनामार्ग आहे. या सूक्ष्मचित्रांद्वारेच त्या समष्टीशी जोडल्या जातील !’
- ‘कु. अनास्तासिया हिने व्यष्टी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. तिने समष्टी ६१ टक्के पातळी गाठण्याचे ध्येय समोर ठेवावे !’
– सद्गुरु सिरियाक वाले
असे उलगडले सौ. योया सिरियाक वाले यांच्या संतत्वाचे गुपित !
सत्संगाच्या दुसर्या सत्राला भावप्रयोगाने प्रारंभ झाला. भावप्रयोग झाल्यानंतर पू. देयान ग्लेश्चिच यांनी व्यासपिठावर २ खुर्च्या ठेवल्या आणि त्यांपैकी एका खुर्चीत सौ. योया वाले यांना बसण्यास सांगितले. त्यानंतर पू. देयान ग्लेश्चिच यांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सौ. योया यांच्याविषयी काय म्हटले आहे’, ते साधकांना वाचून दाखवले आणि त्याद्वारे सौ. योया सिरियाक वाले समष्टी संत झाल्या असल्याचे घोषित केले. या घोषणेने सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला.
पू. (सौ.) योया वाले यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना पू. देयानदादा, त्यांचा व्यष्टी आढावा घेणार्या पू. (सौ.) भावना शिंदे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर पू. देयान ग्लेश्चिच यांनी पू. (सौ.) योया वाले यांचा सन्मान केला.
त्यानंतर साधकांनी पू. (सौ.) योया वाले यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली. विदेशातील साधकांनी ऑनलाईन माध्यमातून सोहळ्यात सहभाग घेतला.
परात्पर गुरुदेवांना काहीच अशक्य नसून साधकांचा अहं आणि दोष तेच घालवू शकतात ! – पू. (सौ.) योया सिरियाक वाले
पू. (सौ.) योया वाले यांनी व्यक्त केलेले मनोगत !
पू. देयानदादा, पू. (सौ.) भावनाताई आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यामुळे हे शक्य झाले. पती सद्गुरु सिरियाक वाले हे माझे गुरुच आहेत. प्रत्येक वेळी ‘त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवच बोलतात’, असे मला जाणवते. पू. (सौ.) भावनाताई यांना व्यष्टी आढावा देतांना मला त्यांच्यातील प्रीती जाणवली. त्यांनी घेतलेल्या आढाव्यांमुळे अहं निर्मूलनासाठी साहाय्य झाले. ‘माझी प्रगती कशी होणार ?’ असे वाटायचे; परंतु परात्पर गुरुदेवांना काहीच अशक्य नाही. साधकांचे अहं आणि दोष तेच घालवू शकतात.