‘हलाल प्रमाणपत्र’ देणार्या सर्व आस्थापनांवर हिंदु बांधवांनी बहिष्कार घालायला हवा ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद
‘या वर्षी साजरी करा : हलालमुक्त दिवाळी !’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
मुंबई – ‘हलाल’ ही पद्धत अमानवीय आहे. हलालसाठी वापरला जाणारा पैसा उघडपणे आतंकवादी कारवायांसाठी वापरला जातो. ‘हलाल’ प्रमाणित वस्तूंना पैसे देऊन स्वत:सह देश, समाज अन् धर्म यांना संकटात घालत आहोत, हे (हिंदु समाजाने) लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे ‘हलाल प्रमाणपत्र’ देणार्या सर्व आस्थापनांवर हिंदु बांधवांनी बहिष्कार घालायला हवा, असे आवाहन विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. विनोद बंसल यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २३ ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या ‘या वर्षी साजरी करा : हलालमुक्त दिवाळी !’ या ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादात ते बोलत होते.
या परिसंवादात सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता गौरव गोयल आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनीही त्यांचे विचार मांडले. हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम ७ सहस्र २६१ जणांनी पाहिला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
केवळ दिवाळी नव्हे, तर संपूर्ण वर्षभर ‘हलाल’ प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार घालायला हवा ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय
‘हलाल’च्या समांतर अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे हिंदूंनी केवळ दिवाळीतच नव्हे, तर संपूर्ण वर्षभर ‘हलाल’ प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार घालायला हवा. ‘हलाल अर्थव्यवस्था’ ही गंभीर समस्या असून तिच्याविषयी लोकांमध्ये जागृती करायला हवी. हलालच्या अर्थव्यवस्थेमुळे हिंदूंना रोजगार मिळणार नाही. आम्ही अधिवक्ता म्हणून ‘हलाल’विरोधात न्यायालयीन मार्गाने लढा देऊ.
‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या आधारावर इस्लामी बँकेला प्रोत्साहन देण्याचे काम चालू आहे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
भारतात काँग्रेसचे सरकार असतांना इस्लामिक बँकेची निर्मिती करण्याचा घाट घातला गेला होता. वर्ष २०१४ मध्ये केंद्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने हा निर्णय रहित केला. त्यानंतर ग्राहक अधिकारांचा उपयोग करून हळूहळू भारतात हलाल अर्थव्यवस्था आणण्यात आली. ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या आधारावर इस्लामी बँकेला प्रोत्साहन देण्याचे काम चालू आहे. याकडे हिंदूंनी जागरूकतेने पहायला हवे. ‘हलाल व्यवस्था’ ही अल्पसंख्यांकांची हुकूमशाही आहे. जिथे हुकूमशाही आहे, तिथे आतंकवाद आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
‘हलाल’ मांस म्हणजे काय ?हलाल पद्धतीचे मांस मिळण्यासाठी प्राण्याच्या गळ्याची नस चिरली जाते आणि प्राण्याला सोडून दिले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वहाते आणि नंतर त्या प्राण्याचा तडफडून मृत्यू होतो. या प्राण्याचा बळी देतांना त्याचा तोंडवळा मक्केच्या दिशेने केला जातो. |
यंदाची दिवाळी ही ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करा !
श्री. रमेश शिंदे यांनी केलेले आवाहन
भारतात दिवाळीसारख्या सणांत हिंदु ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे आम्ही ‘हलालमुक्त दिवाळी’ ही मोहीम राबवत आहोत. हिंदूंनी या दिवाळीला ‘हलाल’ प्रमाणित उत्पादने न घेता यंदाची दिवाळी ही ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करावी. ‘फॅब इंडिया’च्या विज्ञापनातून दिवाळीला ‘जश्न-ए-रिवाज’ असे संबोधले आहे. हिंदूंच्या परंपरांना इस्लामकडे नेण्याचा प्रयत्न करणार्या अशा उत्पादनांवरही हिंदूंनी बहिष्कार घालावा.