गोव्यात कितीही नवीन पक्ष आले, तरीही निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि काँग्रेस विरोधी पक्ष असेल ! डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पणजी, २९ ऑक्टोबर (वार्ता.) गोव्यात कितीही पक्ष आले, तरी निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष रहाणार आहे. अंतत: हे सर्व लोकांवर अवलंबून आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात अनेक नवीन पक्ष प्रवेश करत असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘निवडणूक घोषित झाल्यानंतर नवीन पक्ष येऊन गोंधळ घालतात आणि निवडणूक झाल्यानंतर ते नाहीसे होतात. वर्ष २०१७ मध्ये असेच घडले होते. मला कोणतीच भीती वाटत नाही. माझा गोमंतकियांवर विश्वास आहे. भाजप शासनाने गोव्यात अनेक विकासकामे केलेली आहेत.’’