पोलिसांकडून ६ दरोडेखोरांना अटक, तर १ आरोपी पसार !
तोंडोळी (संभाजीनगर) येथील दरोडा आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण
संभाजीनगर – जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडोळी शेतवस्तीवरील दरोडा आणि महिलांवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी २६ ऑक्टोबर या दिवशी आणखी ३ दरोडेखोरांना अटक केली आहे. नंदू बोरसे, अनिल राजपूत आणि किशोर जाधव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तिघांपैकी २ दरोडेखोरांना वैजापूर येथून, तर अन्य एका आरोपीला मुंबई येथे पकडण्यात आले आहे. मुंबई येथे पळालेला दरोडेखोर ४ दिवस उसाच्या फडात लपला होता. आतापर्यंत या दरोड्यातील ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर ७ वा आरोपी अद्यापही पसार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. यापूर्वी पोलिसांनी प्रभू पवार (म्होरक्या), विजय जाधव आणि सोमनाथ राजपूत या आरोपींना अटक केली आहे.