‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि ते प्रमाणपत्र देणार्या सर्व संस्थांची चौकशी करा !
कोल्हापूर येथे जिल्हा प्रशासनास निवेदन
कोल्हापूर – धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना देण्यात आले. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेना शाहूवाडी तालुकाप्रमुख श्री. दत्तात्रय पोवार, शिवसेना उंचगाव विभागप्रमुख श्री. दीपक रेडेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री. विनायक जाधव, शिरोलीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. सतीश पाटील, भाजपचे श्री. उत्तम पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, दीपक कातवरे उपस्थित होते.