कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर अंथरुणावर खिळून असतांना नामजपादी उपायांच्या माध्यमातून त्यांच्यावर सतत कृपा करणारे भक्तवत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातनच्या रामनाथी आश्रमातील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर (वय ६६ वर्षे) अंथरुणावर खिळून असतांना नामजपादी उपायांच्या माध्यमातून त्यांच्यावर सतत कृपा करणारे भक्तवत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘सौ. प्रमिला केसरकर अंथरुणाला खिळून असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केसरकरकाकूंना वेळोवेळी सांगितलेले नामजपादी उपाय आणि मी (काकूंचे पती अधिवक्ता रामदास केसरकर यांनी) काकूंसाठी केलेले नामजपादी उपाय अन् या उपायांमुळे काकूंना झालेले लाभ’, यांविषयीची सूत्रे या लेखात दिली आहेत. २८.९.२०२१ या दिवशी ‘परात्पर गुरुदेवांनी सौ. प्रमिला यांच्यासाठी करण्यास सांगितलेल्या नामजपादी उपायांचा परिणाम काय झाला ?’, याविषयी मी त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाचा नामजप करत तेच उपाय चालू ठेवायला सांगितले. या लेखात ७.१०.२०२१ आणि ९.१०.२०२१ या दिवशी परात्पर गुरुदेवांनी काकूंवर करायला सांगितलेल्या नामजपादी उपायांविषयी माहिती दिली आहे.

या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा !https://sanatanprabhat.org/marathi/522663.html

 

परात्पर गुरु डॉ. आठवले

३. ७.१०.२०२१

अधिवक्ता रामदास केसरकर

३ अ. परात्पर गुरुदेवांनी साधकाला ‘दोन्ही हातांचे मधले बोट सौ. केसरकर यांच्या दोन्ही तळपायांवर ठेवून श्रीकृष्णाचा नामजप करा’, असे सांगणे : ७.१०.२०२१ या दिवशी सकाळी मी पुन्हा परात्पर गुरुदेवांना त्यांनी सांगितलेल्या उपायांचा सौ. प्रमिला यांच्यावर झालेल्या परिणामाचा आढावा दिला. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘आपण नामजपादी उपायांमध्ये पालट करूया. तुम्ही काकूंच्या दोन्ही तळपायांवर तुमच्या दोन्ही हातांचे मधले बोट ठेवून श्रीकृष्णाचा नामजप करा.’’ त्याप्रमाणे मी नामजपादी उपाय चालू केले.

४. ९.१०.२०२१

४ अ. काकूंना शारीरिक त्रास असह्य झाल्याने त्यांच्यात बोलण्याचे त्राण नसतांनाही त्यांनी अगतिक होऊन क्षीण आवाजात श्रीकृष्णाला त्याच्याकडे घेऊन जायला सांगणे आणि नंतर त्यांचे बोलणेही बंद होणे : ५.१०.२०२१ या दिवसापर्यंत सौ. प्रमिला दिवसभरात निदान अर्धा पेला पेजेच्या पाण्याचे सेवन करत होत्या. त्यानंतर त्यांनी पेजेचे पाणी घेणेही बंद केले. ९.१०.२०२१ या दिवशी पहाटे सौ. प्रमिला यांना उलट्या झाल्याने त्या कण्हू लागल्या. तेव्हा मी त्यांच्या तोंडात चमच्याने पाणी देण्याचा प्रयत्न केला असता त्या तोंड उघडू शकल्या नाहीत. सकाळी त्या अत्यवस्थ झाल्यावर त्यांचे कण्हणेही बंद झाले. मागच्या आठवड्यापासून त्यांच्यात बोलण्याचेही त्राण नसतांना त्या अगदी अगतिक होऊन क्षीण आवाजात ‘हे श्रीकृष्णा, मला तुझ्याकडे लवकर बोलव ना रे. मला आता हे सहन होत नाही रे’, असे विनवत होत्या. नंतर त्यांचे असे देवाला विनवणेही बंद झाले.

४ आ. ‘परात्पर गुरुदेवांनी साधकाला ‘तुमच्या उजव्या हाताचा तळवा काकूंच्या आज्ञाचक्रावर ठेवून श्रीकृष्णाचा नामजप करायला आणि ‘श्रीकृष्णा, तू यांची या यातनांतून लवकर सुटका कर’, अशी प्रार्थना करायला सांगणे : मी गुरुदेवांना त्याच दिवशी सकाळी याविषयी भ्रमणभाषद्वारे कळवले आणि काकूंना होणार्‍या तीव्र यातनांतून त्यांची सुटका होण्यासाठी काही नामजपादी उपाय सांगण्यासाठी प्रार्थना केली. त्या वेळी गुरुदेव म्हणाले, ‘‘त्यांची लवकर सुटका होण्यासाठी नामजपादी उपाय सांगतो. असा उपाय मी प्रथमच सांगत आहे. तुम्ही काकूंच्या आज्ञाचक्रावर तुमच्या उजव्या हाताचा तळवा ठेवा आणि तुम्ही श्रीकृष्णाचा नामजप करा. मधून मधून श्रीकृष्णाला प्रार्थना करा, ‘श्रीकृष्णा, सौ. प्रमिला यांची या यातनांतून लवकर सुटका कर.’ तुम्हाला जमेल तेवढा वेळ तुम्ही हा नामजपादी उपाय करा.’’

कै. (सौ.) प्रमिला केसरकर

४ इ. ‘एरव्ही आपण ‘देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे’, अशी प्रार्थना करतो; मात्र आता नाईलाज असल्याने या संदर्भात आपण देवाला अशी प्रार्थना करत आहोत’, असे परात्पर गुरुदेवांनी सांगणे : ते पुढे म्हणाले, ‘‘केसरकर, आपण अशी प्रार्थना कधी केली नाही. आपण प्रथमच करत आहोत. काकूंची आध्यात्मिक पातळी चांगली आहे. त्यांची पुढील प्रगती जलद होईल. त्यांच्यामुळे मलाही नवीन नवीन शिकायला मिळत आहे. अन्य वेळी ‘देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे’, असे आपण म्हणतो; परंतु आता निरुपाय आहे. त्यामुळे आपण देवाला अशी प्रार्थना करत आहोत.’’

४ ई. परात्पर गुरुदेवांनी सौ. प्रमिला यांची स्थिती पाहून त्यांच्यासाठी नामजपादी उपाय सांगणे आणि त्यानंतर अधिवक्ता केसरकर यांना मुद्रा करून पत्नीवर नामजपादी उपाय आणि प्रार्थना करायला सांगणे : ९.१०.२०२१ या दिवशी सायंकाळी ४ वाजता परात्पर गुरुदेवांनी प्रमिला यांच्या त्रासाविषयीची माहिती जाणून घेतली. काकूंची स्थिती पाहून गुरुदेवांनी त्यांच्यासाठी नामजपादी उपाय सांगितले आणि मला म्हणाले, ‘‘आता तुम्ही तुमचे मधले बोट आणि अंगठा यांची मुद्रा करून ‘श्रीकृष्णाय नमः ।’ हा नामजप करत काकूंच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत सर्व शरिरावरून फिरवत नामजपादी उपाय करा आणि मधून मधून प्रार्थना करा, ‘श्रीकृष्णा, तू यांची या यातनांतून लवकर सुटका कर.’ हा नामजपादी उपाय तुम्हाला जमेल तेवढा वेळ करा.’’

४ उ. त्यानंतर गुरुदेवांनी प्रमिला यांना सांगितले, ‘‘तुम्ही लवकरच कृष्णाकडे जाणार आहात. तो तुमची लवकरच सुटका करणार आहे.’’

४ ऊ. गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे मी नामजपादी उपाय चालू केले.

५. ११.१०.२०२१

५ अ. परात्पर गुरुदेवांनी ‘‘सौ. केसरकर यांच्या हाता-पायांच्या बोटांतून चैतन्य बाहेर प्रक्षेपित होत आहे आणि त्या काहीही खात-पित नसल्या, तरी चैतन्याच्या बळावर त्रासाशी लढत असल्याने त्यांच्या तोंडवळ्यावर आनंद दिसत आहे’’, असे सांगणे : ११.१०.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता परात्पर गुरुदेवांनी सौ. केसरकर यांची स्थिती जाणून घेतली. परात्पर गुरुदेवांनी काकूंसाठी नामजपादी उपाय केले. नंतर ते मला म्हणाले, ‘‘सौ. केसरकर यांच्या हाता-पायांच्या बोटांतून चैतन्य प्रक्षेपित होत आहे. त्यांचे खाणे-पिणे बंद झाले असले, तरीही चैतन्याच्या बळावर ते त्रासाशी लढत आहेत आणि त्यांच्या तोंडवळ्यावर आनंद आहे. ‘खाणे-पिणे काहीही नसले, तरी आपले शरीर चैतन्यावर कसे टिकते ?’, याचे हे उदाहरण आहे.’’ (६.१०.२०२१ पासून सौ. प्रमिला केसरकर यांचे खाणे-पिणे पूर्णपणे बंद झाले होते.)

५ आ. परात्पर गुरुदेवांनी सौ. केसरकर यांना ‘‘आता लवकरच तुम्ही श्रीकृष्णाकडे जाणार आहात, काही काळजी करू नका’’, असे सांगणे : त्यानंतर मी गुरुदेवांना म्हणालो, ‘‘सौ. केसरकर यांच्यावर आपण सांगितलेले नामजपादी उपाय करतांना मला ५ – १० मिनिटांतच थकायला होते.’’ त्यावर गुरुदेव म्हणाले, ‘‘पहा त्रासाची तीव्रता किती आहे ! युद्ध कसे चालले आहे ?’’ त्यानंतर ते सौ. केसरकर यांना म्हणाले, ‘‘आता लवकरच तुम्ही श्रीकृष्णाकडे जाणार आहात. काही काळजी करू नका.’’

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

(क्रमशः)

– अधिवक्ता रामदास केसरकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१०.२०२१)