(म्हणे) ‘बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणांत मंदिरांची तोडफोड आणि बलात्काराच्या घटना झाल्याच नाहीत !’ – बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्री
|
बांगलादेश सरकार स्वतःची लाज राखण्यासाठी अशा प्रकारचा खोटा दावा करत आहे, हे सांगायला कोणत्याही तज्ञांची आवश्यकता नाही. जे जगाने पाहिले आहे, त्याला थेट नाकारणे हा खोटारडापणाच आहे. याविषयी भारताने जागतिक समितीकडून याची चौकशी करण्याची मागणी करावी आणि सत्य जगासमोर आणावे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
ढाका (बांगलादेश) – सध्या चालू असलेल्या प्रचाराच्या उलट स्थिती आहे. देशात नुकत्याच झालेल्या हिंसाचारामध्ये केवळ ६ लोकांचा मृत्यू झाला. पोलिसांसमवेत झालेल्या चकमकीच्या वेळी ४ मुसलमान आणि २ हिंदू यांचा मृत्यू झाला. यातील एका हिंदूचा मृत्यू ‘सामान्य स्थितीत’ झाला, तर दुसर्याने तलावामाध्ये उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. या हिंसाचारात बलात्काराची एकही घटना घडली नाही आणि हिंदूंच्या एकाही मंदिरावर आक्रमण करून ते नष्ट करण्यात आले नाही; मात्र काही ठिकाणी मूर्तींची तोडफोड करण्यात आली, जी दुर्दैवी घटना होती, अशी माहिती बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. एके अब्दुल मोमेन यांनी या हिंसाचाराच्या घटनांविषयी प्रथमच दिली.
Bangladesh communal violence: No one was raped and not a single temple was destroyed, says Foreign Ministerhttps://t.co/gRzkC0aMwA
— TIMES NOW (@TimesNow) October 29, 2021
डॉ. मोमेन पुढे म्हणाले की, सामाजिक माध्यमे आणि काही ‘उत्साही’ प्रसारमाध्यमे यांनी याविषयी चुकीची माहिती पसरवली. हा सरकारला अपकीर्त करण्याचा प्रयत्न होता. गेल्या काही वर्षांत बांगलादेशातील दुर्गापूजेच्या मंडपांच्या संख्येत वाढ झाली आहे; कारण सरकार त्यांना अनुदान देते. (सरकार अनुदान देत असेल आणि मंडपांच्या संख्येत वाढही झाली असेल; मात्र सरकार त्यांना संरक्षण पुरवत नाही आणि त्यामुळे धर्मांध मंडपांना लक्ष्य करत आहेत, ही वस्तूस्थिती मोमेन मान्य का करत नाहीत ? – संपादक)