अशा ‘तुशारा’ भारतात सर्वत्र हव्यात !
संपादकीय
- ‘हलाल’ या धार्मिक अर्थव्यवस्थेला विरोध करणे, हे हिंदूंचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यच !
- भारतीय अर्थव्यवस्थेवरील ‘हलाल’चे आक्रमण थोपवण्यासाठी हिंदूसंघटन आवश्यक !
निधर्मी म्हणवणार्या भारताची अर्थव्यवस्था ‘हलाल’ या धार्मिक अर्थव्यवस्थेद्वारे पोखरली जात आहे. इस्लामी राष्ट्रांत वस्तूंच्या निर्यातीसाठी ‘हलाल’ प्रमाणपत्र घेण्यास बाध्य केले जाते. आता भारतातील मुसलमानही हलाल प्रमाणित वस्तूंची मागणी करू लागल्याने भारतातील अनेक नामांकित उत्पादनांनी शुल्क देऊन हलाल प्रमाणपत्र घेतले आहे. यातून मिळणारे कोट्यवधी रुपये इस्लामी संघटनांना मिळतात, ज्यांतील काही संघटना आतंकवादी कारवायांमध्ये अडकलेल्या धर्मांधांना सोडवण्यासाठी न्यायालयीन साहाय्य करत आहेत.
‘भारतातील कोणत्या धर्माचे लोक आतंकवाद्यांचे लक्ष्य असतात ?’, हे जगजाहीर आहे. त्यामुळे ‘स्वत:चे पैसे देऊन स्वत:ची अन् आप्तेष्टांची सुरक्षितता धोक्यात घालण्याचे काम भारतातील हिंदू करत आहेत’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून हिंदूंचा हिंदूंच्याच विरोधात प्याद्याप्रमाणे उपयोग करून घेतला जात आहे. गंभीर गोष्ट म्हणजे भारतातील कित्येक हिंदूंना याविषयी ठाऊकही नाही. जे हिंदू जागरूक आहेत, ते यास विरोध करतात; मात्र अशा हिंदूंवर आक्रमणे केली जातात. नुकतीच केरळ येथे घडलेली घटना याला साक्षी आहे. केरळ येथे हलालमुक्त उपाहारगृह उघडणार्या तुशारा अजित यांना धर्मांधांनी अमानुष मारहाण केली. त्यांनी उपाहारगृहाला लावलेला ‘हलालमुक्त’चा फलक काढण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. तुशारा अजित यांनी फलक हटवला नाही, तेव्हा त्यांच्या दुकानातील ‘फर्निचर’ची तोडफोड करण्यात आली.
‘साक्षर’ राज्याची हीच का सभ्यता ?
भारतातील सर्वाधिक साक्षरांचे राज्य म्हणून केरळचा उल्लेख केला जातो. एरव्ही देशातील महागाई, बेरोजगारी आदी विषयांवरून विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी केंद्रातील सरकारला धारेवर धरतात. स्वत:च्या आर्थिक स्वायत्ततेसाठी प्रयत्न करत असतांना जर कुणी महिला भारतातील अर्थव्यवस्थेवरील आक्रमण थोपवण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर तिचे कौतुक व्हायचे सोडून तिला मारहाण होते, हे कितपत योग्य ? सर्वाधिक साक्षरांचे राज्य म्हणवणार्या केरळमधील लोकांची हीच सभ्यता आहे का ? ‘मारहाण करणार्या धर्मांध मानसिकतेचे आम्ही समर्थन करत नाही’, अशी मखलाशी कुणी करत असतील, तर ते उघडपणे धर्मांधता, हलाल यांच्या विरोधात कृती करण्यास पुढे का येत नाहीत ? खरेतर केरळ राज्य हिंदूंच्या दृष्टीने पूर्वीपासूनच असुरक्षित राहिले आहे. केरळमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या दिवसाढवळ्या हत्या होतात. साम्यवादी सरकार अशा हत्या करणार्यांना पाठीशी घालते. ‘हिंदुद्वेषी प्रचार’ हा साम्यवाद्यांचा अजेंडा असल्याने केरळमध्ये हिंदु संस्कृती धोक्यात आहे. केरळमध्ये धर्मांधांचा उन्मादही वाढत आहे. तुशारा अजित यांच्यावरील आक्रमण हे केरळमधील हिंदूंच्या स्थितीचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. तेथील हिंदू कशा प्रकारे पिचलेला आहे, याचे बिंब या घटनेतून दिसून आहे.
स्त्रीमुक्तीवाले कुठे आहेत ?
तुशारा अजित यांना मारहाण झाल्यावर त्याचा निषेध करण्यासाठी एकही स्त्रीमुक्तीवादी पुढे आला नाही. ‘केरळमधील शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश द्या’, असे म्हणत तथाकथित पुरोगामी महिलांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न चालवला. या महिला न्यायालयापर्यंत गेल्या. न्यायालयात जाण्यासंदर्भात दुमत नाही; परंतु प्रश्न ढोंगी मानसिकतेचा आहे. धर्माच्या मर्यादा पायदळी तुडवण्यासाठी स्त्रीसन्मानाचा मुलामा देणे, वितंडवाद माजवणे आणि एका महिलेवर खरोखर अन्याय होत असतांना गप्प रहाणे, ही वृत्ती समाजासाठी घातक आहे.
कोणत्याही संकटांचा वैध मार्गाने सामना करण्याची हिंदूंची मानसिकता असते; मात्र धर्मांध नेहमी कायदा हातात घेतात. त्या वेळी निधर्मीवाल्यांचे डोळे मिटलेले असतात. तुशारा अजित यांच्यावरील आक्रमणाच्या संदर्भात हेच दिसून येते. कायद्याला अनुसरून भूमिका घेणार्या हिंदूंवर हेच निधर्मीवाले आगपाखड करतात. भारताच्या सार्वभौमत्वाला अशा उथळ विचारसरणीच्या निधर्मीवाल्यांपासून मोठा धोका आहे. भारतातील हिंदूंवर निधर्मीपणाची झूल घालण्याचे काम थांबवले गेले, तरच हिंदू जागृत होऊन हलालसारख्या जिहादी संकटाशी लढू शकतील आणि भारताचे इस्लामीस्तान होण्यापासून रोखू शकतील.
तुशारा यांच्या पाठीशी हिंदूंनी खंबीरपणे उभे रहावे !
‘हलाल’ अर्थव्यवस्थेला विरोध करण्यासाठी तुशारा अजित यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. एक महिला असूनही आणि केरळसारख्या हिंदुद्वेषी पार्श्वभूमी असलेल्या राज्यात त्या निडरपणे उभ्या राहिल्या अन् सर्वत्रच्या हिंदूंसाठी चांगला पायंडा घालून दिला. हा त्यांचा धर्माभिमान तर आहेच, शिवाय निधर्मीवाल्यांच्या भाषेत सांगायचे, तर ते त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहे. तसेच हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आक्रमण करणार्यांना थोपवण्यासाठी केलेला व्यापक विचार आहे. ‘हलाल अर्थव्यवस्था’ हे केवळ धार्मिक सूत्र नसून तो राष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय संपत्ती आणि पर्यायाने भारतियांचा रोजगार-पैसा यांच्याशी निगडित विषय आहे. तुशारा अजित यांनी छेडलेल्या तारेचे सूर संपूर्ण भारतभरात उमटायला हवेत. भारतातील विविध राज्यांतील हिंदूंनी हलाल अर्थव्यवस्थेला नेटाने विरोध करायला हवा. त्याविरोधात जागृती निर्माण करायला हवी. एका महिलेवर झालेल्या आक्रमणाचा निषेध तर करायचा आहेच त्याशिवाय त्या महिलेच्या व्यापक विचाराचा प्रचार करून तिचा सन्मानही करायचा आहे. ही राष्ट्रीय भावना भारतातील हिंदूंच्या मनात निर्माण व्हायला हवी. सध्या हिंदूंचा मोठा सण दिवाळी जवळ येत आहे. या उत्सवात हिंदूंनी ‘हलालमुक्त भारता’चा संकल्प करून कृतीशील व्हायला हवे !