नाशिक येथे बसस्थानकात एका महिलेवर सामूहिक बलात्कार करणार्या चौघांविरोधात गुन्हा नोंद !
असुरक्षित महाराष्ट्र ! संपादक
नाशिक – जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथील बसस्थानक परिसरात एका ४२ वर्षीय महिलेवर ४ जणांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांवर बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करून त्यांना कह्यात घेतले आहे. ही घटना २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १ वाजता घडली. पीडित महिला ही वैद्यकीय सेवेसाठी गेली होती. त्यानंतर बसस्थानक परिसरातील निर्मनुष्य भागात या ४ संशयितांनी जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.