रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर साधकाला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६८ टक्के पातळीच्या साधिका कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचा निधनानंतरचा अकरावा दिवस २८ ऑक्टोबर २०२१ या दिवशी आहे. कै. (सौ.) केसरकर यांच्याविषयी श्री. भूषण कुलकर्णी यांना त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. निधनापूर्वी
अ. ‘कै. (सौ.) प्रमिला केसरकरकाकू यांचे निधन होण्यापूर्वी त्यांनी सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट घेऊन त्यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला आणि देह सोडण्याची अनुमती मागितली’, असे मला जाणवले.
आ. ‘मागील काही दिवसांपासून काकू केवळ चैतन्यावरच जगत होत्या आणि त्यांचा अंतिम क्षणापर्यंत नामजप चालू होता’, असे मला जाणवले.
२. १८.१०.२०२१ या दिवशी रात्री ९.३० वाजल्यानंतर आणि १९.१०.२०२१ या दिवशी सकाळी उठल्यावर मला वातावरण स्तब्ध झाल्यासारखे जाणवत होते. (‘कै. (सौ.) केसरकर यांचे १८.१०.२०२१ या दिवशी रात्री १०.३० वाजता निधन झाले.’ – संकलक)
३. निधनानंतर
अ. ‘वाईट शक्ती काकूंचा लिंगदेह कह्यात घेण्याचा प्रयत्न करत होत्या; पण काकूंच्या लिंगदेहाभोवती ‘गुरुकृपा आणि साधना’ यांचे संरक्षककवच असल्यामुळे वाईट शक्ती काही करू शकत नव्हत्या’, असे मला सूक्ष्मातून दिसले.
आ. काकूंचे अंत्यदर्शन घ्यायला जाण्यापूर्वी मला त्यांचा लिंगदेह कृतज्ञताभावात, शरणागतभावात आणि आनंदी दिसला.
४. (कै.) सौ. प्रमिला केसरकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना
अ. काकूंची त्वचा पिवळसर झाली होती. त्यांच्यातील चैतन्य वाढल्यामुळे त्यांची त्वचा पिवळसर झाल्याचे मला जाणवले.
आ. काकू ६६ वर्षांच्या न वाटता ५० वर्षांच्या वाटत होत्या.
इ. ‘काकू झोपल्या आहेत आणि त्या केव्हाही उठतील’, असे मला वाटत होते.
ई. त्यांच्याकडे पाहिल्यावर माझा भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले.
उ. मला सूक्ष्मातून सुगंध आला.
ऊ. मला सूक्ष्मातून काकूंचा तोंडवळा दिसला आणि ‘त्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत’, असे जाणवले. त्या वेळी मला काकूंच्या डोळ्यांत भावाश्रू दिसले.
ए. ‘काकूंचा लिंगदेह सूक्ष्मातून आलेल्या विष्णुदासांच्या कवचामध्ये पुढच्या लोकांत मार्गस्थ झाला’, असे मला जाणवले.
ऐ. ‘काकू लवकरच संत होतील’, असे मला जाणवले.’
– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०२१)
|