कोडगु (कर्नाटक) येथे भक्तांनी अर्पण केलेल्या मद्याची चोरी करणार्या व्यक्तीला कोरगज्जा देवतेने केली शिक्षा ! – भक्तांमध्ये चर्चा
मडिकेरी (कर्नाटक) – भक्तांनी अर्पण केलेल्या मद्याची चोरी करणार्याला कोरगज्जा देवतांनी शिक्षा केली असल्याची चर्चा कोडगु जिल्ह्यातील सुंटिकोप्पाच्या केदकल गावात ऐकू येत आहे.
आठवड्यापूर्वी एका व्यक्तीने कोरगज्जा देवस्थानातून मद्याचे पाकीट चोरल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले होते. भक्तांनी अर्पण केलेले मद्याचे पाकीट नाहीसे झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘चोरणार्याला शिक्षा करावी’, असे साकडे पुजारी उमेश यांनी कोरगज्जा देवतांना घातले. साकडे घातल्यावर २ दिवसांतच मद्य चोरणार्याचे डोळे काळे होऊन त्यांना सूज येऊन ते संपूर्ण मिटलेच आहेत, असे लोक सांगत आहेत. नंतर त्याने येऊन कोरगज्जा देवतांना साकडे घालून क्षमायाचना केल्यावर डोळ्यांत सुधारणा होत असल्याचे लोकांच्या बोलण्यावरून लक्षात येत आहे.
मंगळुरू येथे एका मंदिरातील दानपेटीत गर्भनिरोधक टाकणारे देवाला शरण !
दोन दिवसांपूर्वीच मंगळुरू येथील कोरगज्जा देवस्थानाच्या दानपेटीत गर्भनिरोधक टाकल्याने त्रस्त झालले दोघे कोरगज्जा देवतांना शरण गेले. पोलिसांनी त्यांना अटक केली, असेही सांगितले जात आहे.