भारताला मुसलमानद्वेषी दाखवण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू महंमद शमी यांना पाकिस्तान्यांकडून ‘ट्रोल’ करण्यात आल्याचे उघड !
-
भारत-पाक सामन्यात शमी यांच्यावर सुमार गोलंदाजीवरून टीका !
-
‘झी न्यूज’ वृत्तवाहिनीची शोधपत्रकारिता !
(टीप : ‘ट्रोल’ करणे म्हणजे एखाद्याला सामाजिक माध्यमांवरून विरोध करणे)
डावपेचात भारतापेक्षा हुशार असलेला पाकिस्तान ! ‘झी न्यूज’ने ज्याप्रमाणे शोधपत्रकारिता केली, तशी पत्रकारिता सर्वांनी करणे अपेक्षित आहे ! याविषयी ‘झी न्यूज’चे अभिनंदन ! – संपादक
नवी देहली – भारत आणि पाक यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यामध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर सामाजिक माध्यमांतून भारताच्या खेळाडूंना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका करण्यात आली. यात कर्णधार विराट कोहली, फलंदाज रोहित शर्मा आदींचा समावेश होता. तसेच गोलंदाज महंमद शमी यांच्यावरही टीका करण्यात आली. ते मुसलमान असल्याने त्यांना ‘ट्रोल’ करण्यात येत असल्याचा आरोप काही धर्मनिरपेक्षतावाद्यांनी केला. तसेच शमी यांचा बचाव करण्यासाठी ‘ट्विटर ट्रेंड’ करण्यात आला होता. याविषयी ‘झी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीने केलेल्या शोध पत्रकारितेनंतर शमी यांच्याविरोधात सामाजिक माध्यमांतून करण्यात आलेली टीका पाकिस्तानी लोकांकडून जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे समोर आले; मात्र यासाठी भारतियांना उत्तरदायी ठरवण्यात आले आणि त्यांच्यावर ते ‘मुसलमानद्वेषी’ असल्याची टीका करण्यात आली. ‘झी न्यूज’ने याविषयी ‘#shamikifarzitrolling’ ट्रेंड चालवला. तो काही वेळातच राष्ट्रीय स्तरावर पहिल्या क्रमांकावर होता.
#DNA : #ShamiKiFarziTrolling से पाकिस्तान एक्सपोज़@sudhirchaudhary
अन्य Videos यहां देखें – https://t.co/ZoADfwSi4S pic.twitter.com/WGjCi0wVso
— Zee News (@ZeeNews) October 26, 2021
पत्रकार बरखा दत्त यांनी अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकात लिखाण करून भारतियांच्या मुसलमानद्वेषी मानसिकतेवर टीकाही केली होती; मात्र ‘झी न्यूज’ने सत्यस्थिती उघड केल्यावर त्यांचा हिंदुद्वेष पुन्हा उघड झाला.