राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २८.१०.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

लव्ह जिहादपासून केवळ धर्मशिक्षणच मुलींना वाचवू शकते ! – कु. श्रुती ओ,  आर्ष विद्या समाजम्, थिरूवनंतपूरम्, केरळ  हिंदु युवतींना लव्ह जिहादपासून वाचवण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक !

कु. श्रुती ओ

लव्ह जिहादमध्ये धर्मांतर ही मुख्य समस्या आहे. केरळमध्ये अशा प्रकारची ४ सहस्रांहून अधिक प्रकरणे झाली आहेत. प्रत्येक वेळी लव्ह जिहादची प्रक्रिया पालटत जाते. पूर्वी खोटे बोलून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर मुलीचे बलपूर्वक धर्मांतर करायचे. आता मात्र मुलींना भावनिक पद्धतीने फसवून, त्यांचा विश्वास संपादन केला जातो. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात असे अडकवले जाते की, मुली धर्मांतर करण्यास सहज सिद्ध होतात. लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींना आम्ही एका पाठ्यक्रमाद्वारे धर्मशिक्षण देऊन त्यांना परत आणले आहे. केवळ धर्मशिक्षणच मुलींना लव्ह जिहादपासून वाचवू शकते.


लव्ह जिहादला रोखण्यासाठी हिंदु मुलींना धर्मशिक्षण द्या ! – प्रा. (सौ.) संदीप कौर मुंजाल, रणरागिणी

सौ. संदीप कौर

मी प्राध्यापक म्हणून गेली ३० वर्षे कार्य करतांना पाहिले आहे की, धर्मांध मुले अशाच पद्धतीने लव्ह जिहादसाठी प्रयत्नशील असतात. ४०० ते ५०० वर्षांपूर्वी शीख गुरूंच्या मार्गदर्शनानुसार शीख लोक मोगलांनी पळवून नेलेल्या मुलींना वाचवून परत आणत असत. लव्ह जिहादला रोखण्यासाठी हिंदु मुलींना धर्मशिक्षण द्यायला हवे. लव्ह जिहादसाठी विविध जातीच्या मुलींना फसवल्यावर धर्मांधांना पैसे मिळतात. हे भीषण सत्य मुलींना अवगत करून द्यायला हवे.


‘देशाला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे’, हे अनेक समस्यांचे उत्तर ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय

अधिवक्ता सुभाष झा

‘हिंदुहितासाठी, हिंदूंना त्यांचे अधिकार मिळण्यासाठी लोकशाही, राज्यघटना आणि न्याययंत्रणा यांमध्ये सुधारणा करण्यापेक्षा ‘देशाला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे’, हे अनेक समस्यांचे उत्तर आहे.’’