‘डाबर’ आस्थापनाकडून लेखी क्षमायाचना !
|
हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान रोखण्यासाठी कायदेशीर लढा देणारे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांचा आदर्श घेऊन प्रत्येक हिंदु अधिवक्त्याने धर्मरक्षणाच्या कार्यात योगदान द्यावे ! – संपादक
मुंबई, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘डाबर’च्या ‘गोल्ड ब्लीच’ (तोंडवळा उजळण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर) या उत्पादनाच्या विज्ञापनात हिंदु धर्मशास्त्राच्या विसंगत समलैंगिक जोडप्याचे ‘करवा चौथ’ व्रत दाखवल्याप्रकरणी आस्थापनाने २६ ऑक्टोबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांची लेखी क्षमायाचना केली आहे. तसेच विज्ञापनातील आक्षेपार्ह भागही वगळला आहे. हिंदु धर्माचा अवमान केल्याप्रकरणी कल्याण येथील धर्मप्रेमी श्री. रामजीत शर्मा यांनी अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांच्याद्वारे डाबर आस्थापनास कायदेशीर नोटीस पाठवली होती. ‘करवा चौथ’ हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते; मात्र या विज्ञापनात समलैंगिक जोडपे व्रत करतांना दाखवण्यात आले आहे. या विज्ञापनाविषयी धर्मप्रेमी हिंदूंकडून संताप व्यक्त करण्यात आला.
हिंदु धर्माचा अवमान करणार्यांच्या विरोधात आवाज उठवायला हवा ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर
विज्ञापनांद्वारे हिंदु सणांचे चित्रण करतांना ते हिंदु धर्मशास्त्रानुसार करायला हवे. उगाचच उदारमतवादीपणा दाखवण्यासाठी वारंवार हिंदु धर्माला लक्ष्य केले जाऊ नये. ‘डाबर’च्या विज्ञापनामध्ये ‘करवा चौथ’ हे व्रत चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आम्ही विरोध केला. अशी अनेक आस्थापने प्रसिद्धीच्या हव्यासापोटी वेळोवेळी अशा प्रकारे वादग्रस्त विज्ञापने करतात. अशा प्रकारच्या विज्ञापनांची चर्चा दीर्घकाळ होत रहाते. त्यामुळे अशा प्रकारांच्या विरोधात वेळोवेळी तक्रार प्रविष्ट व्हायलाच हवी.