मी जन्माने हिंदु होतो आणि आताही हिंदुच आहे ! – समीर वानखेडे, विभागीय संचालक, अमली पदार्थविरोधी पथक
मुंबई – माझी आई जन्माने मुसलमान होती. माझ्या वडिलांशी लग्न करून तिने हिंदु धर्म स्वीकारला होता. मी धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे. मी ईदही साजरी करतो आणि दिवाळीही साजरी करतो. मी मंदिर आणि मशीद दोन्हींमध्ये जातो. आईच्या इच्छेनुसार मी मुसलमान धर्माच्या रितीप्रमाणे लग्न केल्यानंतर ‘स्पेशल मॅरेज ॲक्ट’प्रमाणे विवाह नोंदणी केली आहे. हा काय गुन्हा झाला का ? माझ्यावर करण्यात येणारे आरोप अत्यंत खालच्या दर्जाचे आहेत. मी धर्म पालटलेला नाही. मुसलमान मुलीशी लग्न केल्याने मी मुसलमान होतो का ? मी जन्माने हिंदु होतो आणि आताही हिंदु आहे, असे वक्तव्य अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहे. अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचे वडील मुसलमान असून समीर वानखेडे हेही मुसलमान आहेत, दावा केला आहे. यावर समीर वानखेडे यांनी वरील उत्तर दिले आहे.