उल्हासनगर येथे भाजपच्या २१ नगरसेवकांसह ११४ जणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश !
ठाणे, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – भाजपच्या ३२ पैकी २१ नगरसेवकांनी, तसेच वरप, म्हारळ, कांबा या ग्रामपंचायतींचे उपसरपंच आणि सदस्यांसह अनुमाने ११४ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री डॉ. जीतेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांनी पक्षप्रवेश केला. डॉ. आव्हाड यांनी सौ. पंचम कलानी यांना उल्हासनगरच्या जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र दिले. विशेष म्हणजे टीम ओमी कलानीही राष्ट्रवादीमध्ये विलीन झाली आहे.