४ राज्यांत २५ गुन्हे नोंद असलेल्या गुजरातच्या ‘हेल्मेट गँग’ला नगर पोलिसांनी पकडले !
नगर – अधिकोषाच्या बाहेर पाळत ठेवून पैसे काढून निघालेल्या ग्राहकांच्या हातातील बॅग हिसकावणारी आंतरराज्य टोळी नगर पोलिसांनी पकडली असून या टोळीतील ६ जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील आरोपी असलेल्या या टोळीला ‘हेल्मेट गँग’ म्हणून ओळखण्यात येते. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, बंगाल अशा ४ राज्यांत या टोळीविरुद्ध २५ गुन्हे नोंद आहेत. शिरस्त्राण घालून चोर्या करण्याची टोळीची पद्धत पोलिसांना माहिती होती. त्या दृष्टीने पोलिसांनी लक्ष ठेवले आणि गुन्हा करतांना आरोपींना पकडले.