काश्मीरमधील वैद्यकीय महाविद्यालयांतील दोघा विद्यार्थ्यांवर बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायद्याच्या अंतर्गत गुन्हे नोंद
पाकने भारत-पाक क्रिकेट सामना जिंकल्यावर विजय साजरा केल्याचे प्रकरण
केवळ गुन्हे नोंद करून न थांबता अशांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर भारतात अनेक ठिकाणी पाकिस्तानचा विजय साजरा केल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी श्रीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांविरुद्ध बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायद्याच्या अंतर्गत (यू.ए.पी.ए. अंतर्गत) २ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. करण नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ‘शेर-ए-कश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस’ यांच्या वसतीगृहात रहाणार्या विद्यार्थ्यांवर हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
Kashmir students who celebrated India’s loss to Pakistan booked under UAPA, to be barred from govt jobs https://t.co/2xJpaZVpdh
— OpIndia.com (@OpIndia_com) October 26, 2021