पाटलीपुत्र (बिहार) येथे वर्ष २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणी ९ जण दोषी

पाटलीपुत्र (बिहार) – येथील गांधी मैदानात २७ ऑक्टोबर २०१३ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या वेळी झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणी एन्.आय.ए.च्या विशेष न्यायालयाने १० आरोपींपैकी फखरुद्दीन नावाच्या आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. तसेच अन्य ९ आरोपींना दोषी ठरवण्यात आले. यांमध्ये उमर सिद्दीकी अझरुद्दीन, अहमद हुसेन, फक्रुद्दीन, फिरोज आलम उपाख्य पप्पू, नुमान अन्सारी, इफ्तिखार आलम, हैदर अली उपाख्य अब्दुल्ला उपाख्य ब्लॅक ब्युटी, महंमद आलम उपाख्य पप्पू मोजिबुल्ला अन्सारी आणि इम्तियाज अन्सारी उपाख्य आलम यांचा समावेश आहे. त्यांना येत्या १ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या स्फोटांच्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह १२ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले. त्यांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर अल्पवयीन आरोपीला यापूर्वीच न्यायालयाने ३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील ५ आरोपींना यापूर्वीच बोधगयामधील साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.