समंजस, प्रेमळ आणि चुकांप्रती संवेदनशीलता असलेली ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. आनंदी अमोल शिंदे (वय ४ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. आनंदी अमोल शिंदे ही एक आहेत !
(‘वर्ष २०१८ मध्ये चि. आनंदी अमोल शिंदे हिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के होती.’ – संकलक)
आश्विन कृष्ण पक्ष षष्ठी (२७.१०.२०२१) या दिवशी चि. आनंदी अमोल शिंदे हिचा चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची २ ते ४ वर्षे वयाच्या कालावधीत लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. आनंदी अमोल शिंदे हिला चौथ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. वय – २ ते ३ वर्षे
१ अ. समंजस : ‘मी दुसर्या बाळंतपणासाठी माहेरी असतांना चि. आनंदी माझ्या समवेत होती. मला ज्या दिवशी दुसरी मुलगी झाली, त्याच दिवशी माझे सासू-सासरे नवजात बालिकेला बघायला आले होते. तेव्हा ते आनंदीला म्हणाले, ‘‘आता आईकडे लहान बाळ आहे; म्हणून तू आमच्या समवेत चल.’’ तेव्हा आनंदी आजी-आजोबा यांच्या समवेत घरी जायला लगेच सिद्ध झाली. या आधी ती मला सोडून कधीच राहिली नव्हती. त्या वेळी ती आजी-आजोबा यांच्या समवेत दीड मास राहिली. तिचा समंजसपणा पाहून सर्वांना आश्चर्य वाटले आणि माझी भावजागृती झाली.
१ आ. प्रेमभाव : आम्ही जेवतांना ज्यांना जो पदार्थ आवडतो, तो पदार्थ आनंदी त्यांना देते आणि नंतरच स्वतः घेते. घरातील कुणी रुग्णाईत असल्यास आनंदी त्यांच्या प्रकृतीची प्रेमाने विचारपूस करते.
१ इ. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकत आणि ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ समवेत घेऊन झोपणे : रात्री झोपतांना ती मला प्रतिदिन प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावायला सांगते आणि भजने ऐकत झोपते. ती ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ समवेत घेऊन झोपते. ती ‘या गुरुराया मम मंदिरा ।’ हे भजन दिवसभर म्हणते.
२. वय ३ ते ४ वर्षे
२ अ. प्रेमभाव : तिची आजी घरातील जिन्यावरून उतरत असतांना ती आजीला ‘हळू उतर’, असे सांगते. घरात कुणाला खोकला किंवा ठसका आल्यास ती त्यांना पाणी नेऊन देते.
२ आ. त्यागी वृत्ती : आनंदी खाऊ खात असतांना तिच्याकडे कुणी खाऊ मागितला, तर ती लगेच देते.
२ इ. आदरभाव : संध्याकाळी आरती झाल्यावर आनंदी स्वतःहून घरातील व्यक्तींच्या पायावर डोके टेकवून नमस्कार करते.
२ ई. सात्त्विक वृत्ती : आनंदीला सौ. शोभा हेम्बाडे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांच्या घरी रहायला आवडते. तिला सौ. शोभाकाकूंनी बनवलेले जेवण आवडते.
२ उ. नामजपादी उपाय करण्याची आवड : आनंदी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’, ‘श्री विष्णवे नमः ।’, ‘पांडुरंग हरि’ आणि ‘प.पू. आजोबा-प.पू. आजोबा (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले)’ यांतील एखादा नामजप अधून-मधून करते. आनंदी कापूर आणि अत्तर लावते अन् इतरांनाही लावायला सांगते.
२ ऊ. चुकांप्रती संवेदनशीलता : तिच्याकडून एखादी चूक झाल्यास ती देवाजवळ क्षमायाचना करते.
२ ए. तिला ‘संत तुकाराम’ हा चित्रपट आवडतो. तो चित्रपट पहातांना तिची भावजागृती होते.
२ ऐ. श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
१. आनंदीला कुणी खाऊ दिल्यास ती ‘प.पू. आजोबांनी (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) दिला आहे’, असे सांगते. आनंदीला लहान बहीण झाल्यावर ती म्हणाली, ‘‘श्रीकृष्णानेच आपल्याला लहान बहीण दिली आहे. ती (लहान बहीण) म्हणजे आपला ‘श्रीकृष्ण’ आहे.’
२. ती झोपतांना ‘श्रीकृष्णाची बासरी, मोरपीस आणि श्रीकृष्णाचा शेला समवेत घेऊन झोपत आहे’, असा भाव ठेवते. एकदा मी तिला विचारले, ‘‘तू जेवत का नाहीस ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी कृष्णबाप्पाच्या घरी जाते. कृष्णबाप्पा मला जेवू घालतो आणि शक्ती देतो; म्हणून माझे पोट भरलेले आहे.’’
२ ओ. श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा
२ ओ १. ‘श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्वतःवर लक्ष आहे’, असे सांगणे : एकदा आनंदीचे आजोबा (श्री. लक्ष्मण शिंदे) तिला म्हणाले, ‘‘आनंदी तुझ्याकडे आता (तिला लहान बहीण झाल्यामुळे) कुणी लक्ष देत नाही ना ?’’ तेव्हा आनंदी म्हणाली, ‘‘प.पू. आजोबा (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) आणि श्रीकृष्ण आहेत ना लक्ष द्यायला.’’ ते ऐकून माझी भावजागृती झाली.
२ ओ २. आनंदी तिच्या लहान बहिणीशी खेळत असतांना आनंदी तिला अधून-मधून ‘आपल्याला प.पू. आजोबांकडे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे) जायचे आहे’, असे सांगते.
२ ओ ३. एकदा मला स्वयंपाक करतांना चटका लागला. तेव्हा आनंदीने देवघरात जाऊन विभूती आणली आणि मला म्हणाली, ‘‘ही कृष्णबाप्पाची विभूती लाव. तू लवकर बरी होशील.’’
३. आनंदीतील स्वभावदोष
इतरांचे लक्ष वेधून घेणे.’
– सौ. अवनी अमोल शिंदे (आनंदीची आई), जळगाव (१.१०.२०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |