काहींना स्वार्थ साधता येत नसल्याने समीर वानखेडे यांच्यावर आरोप !
अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप !
मुंबई – समीर वानखेडे यांच्या कामाच्या शैलीमुळे अनेकांना त्रास होत आहे. काही लोकांना त्यांचा स्वार्थ साध्य करता येत नाही. त्यामुळे समीर यांच्यावर आरोप करण्याचे काम चालू आहे, अशी भूमिका समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी २६ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मांडली.
या वेळी क्रांती रेडकर म्हणाल्या, ‘‘समीर वानखेडे हे प्रामाणिक अधिकारी आहेत. मागील १५ वर्षांपासून ते काम करत असून त्यांनी कामात कुठेही खोटेपणा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात येणार्या आरोपांना काहीही अर्थ नाही. ‘ट्विटर’वर कुणीही काहीही बोलू शकतो; परंतु त्याला काहीतरी ठोस बाजू हवी. समीर निश्चितच या सगळ्यांतून बाहेर पडतील; कारण विजय हा सत्याचाच होतो. मला मराठी असल्याचा अभिमान आहे. मला देशभरातून समर्थनाचे संदेश येत आहेत. मला आणि माझ्या कुटुंबाला आपल्याच राज्यात कुणीतरी त्रास देत आहे, हे वाईट आहे.’’