एस्.एस्.आर्.एफ्.च्या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. योया सिरियाक वाले यांच्यातील स्वभावदोषांची जाणीव करून दिल्यावर त्यांची झालेली विचारप्रक्रिया आणि त्यांनी अनुभवलेली परात्पर गुरुदेवांची अपार प्रीती !

१. स्वभावदोषांची जाणीव करून दिल्यावर झालेली विचारप्रक्रिया

सौ. योया सिरियाक वाले

१ अ. ‘तुम्ही काढलेली सूक्ष्म चित्रे योग्य नसून तुम्ही तुमच्यातील स्वभावदोष अन् अहं दूर होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत’, असे एका साधिकेने सांगणे : ‘एकदा कु. प्रियांका लोटलीकर (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सूक्ष्म चित्रकर्त्या साधिका) यांनी माझे यजमान सद्गुरु सिरियाक वाले यांना सांगितले, ‘‘योयाताईंनी काढलेली सूक्ष्म चित्रे योग्य नाहीत. (‘सौ. योया वाले सूक्ष्म चित्रकर्त्या साधिका आहेत.’ – संकलक) त्यांनी त्यांच्यातील स्वभावदोष अन् अहं दूर होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ‘मला चांगला साधक बनायचे आहे. माझी आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशा त्यांना स्वतःकडून पुष्कळ अपेक्षा असतात.’’ ‘त्यांच्यात अहंकार आहे’, असेही कु. प्रियांका यांनी सांगितले.

१ आ. वरील सूत्र ऐकून वाईट वाटून निराशा येणे : ते ऐकून मला वाईट वाटले; कारण ‘हे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू माझ्यात आहेत’, हे मला ठाऊक होते. सकाळी उठल्यापासूनच मी पुष्कळ निराशेत होते. ‘साधकांना त्रास होऊ नये. या गोष्टीचा त्यांच्यावर परिणाम होऊ नये आणि त्यांचा वेळ वाया जाऊ नये’, असे वाटत असल्यामुळे मला साधकांशी बोलावेसे वाटत नव्हते.

 

कु. प्रियांका लोटलीकर

१ इ. ध्यानमंदिरात जाऊन प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. गुरुदेव यांना आत्मनिवेदन करणे अन् स्वतःत पालट घडवून आणण्यासाठी त्यांना प्रार्थना करणे : त्या वेळी माझ्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचे द्वंद्व चालू होते. प.पू. गुरुदेवांना आत्मनिवेदन करत असतांना मी पुष्कळ रडले. नंतर मी ध्यानमंदिरात गेले. तेथे मी सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. गुरुदेव यांच्याशी सर्वकाही बोलले. मी माझ्या चुकांसाठी त्यांच्या चरणी क्षमायाचना करू लागले. ‘मी स्वतःमध्ये कसा पालट करू ?’, हे मला शिकवा आणि तुम्हीच माझ्यातील स्वभावदोष दूर करा’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करत होते; कारण ‘केवळ प.पू. गुरुदेवच माझ्यात पालट घडवून आणू शकतात आणि मला त्यांच्याजवळ घेऊ शकतात’, असे मला जाणवले.

 

१ ई. परात्पर गुरुदेवांनी स्वभावदोषांची जाणीव करून दिल्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे : ‘परात्पर गुरुदेवांनी मला ‘माझ्यात कोणते स्वभावदोष आहेत ?’, हे दाखवून दिल्यामुळेच मी साधनेच्या पुढच्या टप्प्याला जाऊ शकत आहे आणि माझ्यात असलेले सर्व स्वभावदोष मी स्वीकारू शकत आहे’, याची जाणीव होऊन मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

२. एका साधिकेने येऊन ‘परात्पर गुरुदेवांनी तुमची बरीचशी सूक्ष्म चित्रे योग्य असल्याचे सांगितले’, असा निरोप दिल्यावर कृतज्ञता वाटणे

माझे सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांशी बोलणे झाले आणि त्याच वेळी जान्हवीताई (कलेशी संबंधित सेवा करणार्‍या सौ. जान्हवी शिंदे) माझ्याकडे आली. तिच्या तोंडवळ्यावर स्मित होते. तेव्हा ‘ती का हसत आहे ?’, हे मला कळले नाही. मी काढलेली सूक्ष्म चित्रे तिने परात्पर गुरुदेवांना दाखवली होती. ती मला म्हणाली, ‘‘परात्पर गुरुदेवांनी सांगितले आहे की, यांतील बरीचशी सूक्ष्म चित्रे योग्य आहेत.’’ हे ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता, विनम्रता आणि शरणागतभाव जाणवला. मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी क्षमायाचना केली. ‘या सर्व परिस्थितीत त्यांनी (परात्पर गुरुदेवांनी) सूक्ष्मातून मला कसे शिकवले ?’, या विचाराने मला हसू येत होते. त्यांनीच मला सर्व स्वीकारण्याचा, तसेच त्यांच्याशी बोलण्याचा विचार दिल्याबद्दल मला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटत होती.

३. वरील प्रसंगातून शिकायला मिळालेली सूत्रे

अ. वरील प्रसंगातून मला ‘वर्तमानकाळात कसे रहायचे ?’, हे शिकायला मिळाले.

आ. ज्या क्षणी मला माझ्यातील स्वभावदोषांची अंतर्मनातून जाणीव होऊन माझ्यात शरणागती निर्माण झाली, अगदी त्या क्षणी जान्हवीताई आली आणि तिने मला मी काढलेली सूक्ष्म चित्रे परात्पर गुरुदेवांना आवडल्याचा निरोप दिला. माझी प्रत्येक प्रार्थना परात्पर गुरुदेवांपर्यंत पोचली होती.

४. ध्यानमंदिरातून बाहेर आल्यावर आनंद आणि भावावस्था जाणवणे

त्यानंतर मी ध्यानमंदिरातून बाहेर आले. मला आतून पुष्कळ नम्रता, कृतज्ञता आणि आनंद जाणवत होता. मी भावावस्थेतच होते, तसेच ‘गुरुदेवांनी सांगितल्यानुसार मी साधनापथावर मार्गक्रमण करू शकणार होते’, याचा मला आनंद होत होता.

५. कृतज्ञता

मला शिकवणार्‍या आणि माझ्या चुका दाखवून देणार्‍या साधकांप्रती, तसेच सूक्ष्म गुरुतत्त्वाप्रती कृतज्ञता ! ‘या प्रसंगाचा शेवट माझ्या अंतर्मनाची शुद्धी होण्यात झाला’, यासाठीही कृतज्ञता !’

– एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले

(१५.८.२००९)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.