गुरुपुष्यामृतयोग
२८.१०.२०२१ या दिवशी ‘गुरुपुष्यामृतयोग’ आहे. त्या निमित्ताने…
१. ‘गुरुपुष्यामृतयोग’ म्हणजे काय ?
‘गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास ‘गुरुपुष्यामृतयोग’ होतो. या दिवशी ‘सुवर्ण खरेदी करणे आणि शुभकार्ये करणे’, असा प्रघात आहे. सर्व लौकिक किंवा व्यावहारिक कार्यांसाठी हा योग शुभ मानला जातो. एका वर्षात साधारण ३ किंवा ४ वेळा हा योग येतो.
२. आश्विन आणि कार्तिक या मासांतील ‘गुरुपुष्यामृतयोग’
अ. आश्विन कृष्ण पक्ष सप्तमी (२८.१०.२०२१) : सकाळी ९.४१ पासून दुसर्या दिवशी सूर्याेदयापर्यंत
आ. कार्तिक कृष्ण पक्ष षष्ठी (२५.११.२०२१) : सूर्याेदयापासून सायंकाळी ६.४९ पर्यंत
३. आश्विन मासातील ‘गुरुपुष्यामृतयोगा’चे वैशिष्ट्य
आश्विन कृष्ण पक्ष सप्तमी (२८.१०.२०२१) या दिवशी होणार्या ‘गुरुपुष्यामृतयोगा’त गुरु ग्रह मकर राशीत असणार आहे. (‘गुरु ग्रह मकर राशीत असणे’, म्हणजे गुरु ग्रह त्याच्या नीच राशीत असणे.) सुवर्ण खरेदी करण्यासाठी हा ‘गुरुपुष्यामृतयोग’ फारसा लाभदायक नाही. या काळात शारीरिक त्रास होण्याची आणि आर्थिक मंदीचे संकट असण्याची शक्यता आहे.
४. ‘गुरुपुष्यामृतयोगा’वर अधिकाधिक साधना करा !
आश्विन आणि कार्तिक या मासांतील ‘गुरुपुष्यामृतयोग’ साधनेसाठी अनुकूल आहेत; कारण गुरु ग्रह मकर राशीत असतांना आध्यात्मिक त्रास होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी साधकांनी ‘गुरुपुष्यामृतयोगा’वर सुवर्ण खरेदी करण्यापेक्षा अधिकाधिक साधना करणे आवश्यक आहे. आपल्या जीवनाचे सोने करण्यासाठी गुरूंचे आज्ञापालन करून अष्टांग साधनेचे प्रयत्न करूया.’
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित आणि हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.९.२०२१)