हिंदूंवर आक्रमणे चालूच राहिली, तर एक दिवस बांगलादेशातील हिंदु समाज संपूर्णपणे नष्ट झालेला असेल !
-
बांगलादेशात होणार्या हिंदूंवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केली भीती
-
सावंतवाडी तहसीलदारांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन
हिंदूंना अशा मागण्या कराव्या लागू नयेत, असे पाऊल सरकारने उचलले पाहिजे ! बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांविषयी सर्वपक्षीय नेते मूग गिळून गप्प का आहेत ? एरवी राजकारण करण्यासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे, आंदोलने करणारे राजकारणी हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो, तेव्हा मौन का पाळतात ? – संपादक |
सावंतवाडी, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी ‘कुराणचा अवमान केला’, अशी अफवा पसरवून अनेक दुर्गापूजा मंडपांवर आणि हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. या हिंसाचाराची माहिती आता पुढे येत असून आतापर्यंत या हिंसाचारात ४ हिंदूंना ठार मारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथील सरकार ‘हिंदूंचे रक्षण करू’, असे सांगत असले, तरी ते धर्मांधाना रोखू शकत नाही. हिंदूंवर आक्रमणे चालूच राहिली, तर एक दिवस बांगलादेशातील हिंदु समाज संपूर्णपणे नष्ट झालेला असेल. त्यामुळे बांगलादेशात हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सावंतवाडी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. याविषयीचे निवेदन नायब तहसीलदार मनोज मुसळे यांच्याकडे देण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते होते.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. ‘हिंदू व्हॉईस’ या वृत्तसंकेतस्थळाने धर्मांधानी श्री दुर्गादेवीची मूर्ती नदीत फेकण्याचा व्हिडिओ केला, तसेच कॅमिला या भागातील ९ मंडपांवर आक्रमण करून तेथील मूर्तींची तोडफोड केल्याची माहिती दिली आहे. येथील हिंदूंवर आक्रमणे अजूनही चालू आहेत. या सर्व स्थितीत येथील हिंदू भयभीत झाले आहेत.
२. अधिवक्ता गोबिंद चंद्र प्रामाणिक यांनी बांगलादेशातील स्थिती अत्यंत भयावह असून १५० हिंदु कुटुंबांवर आक्रमणे करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
३. नोआखाली येथील हटीयामध्ये धर्मांधांनी तोडफोड करत कालीमाता मंदिरातील मूर्तीची तोडफोड केली. येथील महिलांची छेड काढत हिंदूंना मारहाण केली. या भागात २ हिंदूंचे मृतदेह सापडले आहेत.
४. ‘नॅशनल हिंदू युथ ग्रँड अलायन्स’च्या चांदपूर जिल्हा शाखेच्या प्रचार सचिवाची हत्या करण्यात आली.
५. हाजिगंज चादपूर येथे एक महिला, तिची मुलगी आणि १० वर्षांची भाची यांच्यावर धर्मांधांनी बलात्कार केला.
६. नोआखाली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर ‘इस्कॉन’च्या एका मदिरांवर २०० हून अधिक धर्मांधांनी आक्रमण केले. यामध्ये ‘इस्कॉन’च्या मंदिरातील २ साधू निताई दास प्रभू आणि जतन दास प्रभू, तसेच २५ वर्षीय भाविक पार्थ दास यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
७. वर्ष १९३० पासून आतापर्यंत अनेक दंगली, हिंदूंच्या हत्या अशा अनेक घटना घडल्या; मात्र त्यांची नोंद वृत्तपत्रांनी घेतली नाही.
८. बांगलादेशात वर्ष १९४७ मध्ये २८ टक्के असलेली हिंदूची लोकसंख्या आता केवळ ८ टक्के आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर काही वर्षांनी बांगलादेशातील हिंदु समाज संपूर्णपणे नष्ट झालेला असेल. हिंदूंना सुरक्षा पुरवली नाही किंवा असेच चालू राहिले, तर बांगलादेशाशी सर्व प्रकारचे संबंध संपुष्टात येतील, अशी चेतावणी तेथील सरकारला द्यावी.