उत्पादनाअभावी अमरावती येथे शेतकर्याने संत्र्याच्या ५०० झाडांवर चालवला बुलडोझर !
अमरावती – संत्र्याच्या झाडावर असलेल्या विविध रोगांमुळे संत्र्यांची गळती होऊन शेतकर्यांची प्रचंड हानी होत आहे. लाखो रुपये व्यय करूनही काहीच उत्पादन होत नसल्याने जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यातील संजय आवारे या शेतकर्याने स्वतःच्या ४ एकर संत्र्याच्या बागेतील ५०० झाडांवर बुलडोझर चालून बाग नष्ट केली. त्यांनी १४ वर्षांपूर्वी संत्राच्या झाडांची लागवड केली होती.