रणांगणात लढलेल्या वीरांगनांचा आदर्श घेऊन स्वत:मध्ये शौर्य निर्माण करा ! – कु. प्राची शिंत्रे, हिंदु जनजागृती समिती
आदिशक्तीचा जागर करण्यासाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन
सोलापूर – भवानीमातेच्या कृपाशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली; मात्र सध्या हिंदु स्त्रियांचे धर्मांतर करून त्यांना जिहादी आतंकवादी बनवणे, हिंदु स्त्रियांना नक्षलवादी चळवळीत सहभागी करून घेणे यांसारख्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हिंदु युवतींनी अभिनेत्रींचा आदर्श न घेता रणांगणात लढलेल्या वीरांगनांचा आदर्श घेऊन स्वत:मध्ये शौर्य निर्माण करावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्राची शिंत्रे यांनी केले. सोलापूरमधील युवतींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या व्याख्यानाला १५० युवती ‘ऑनलाईन’ सहभागी झाल्या होत्या. या शौर्यजागृती व्याख्यानाचा उद्देश समितीचे श्री. मिनेश पुजारे यांनी सांगितला, तर सूत्रसंचालन कु. शीतल पारे यांनी केले.