सनातनच्या एका साधकाचा जीवनातील समस्यांकडे बघण्याचा सकारात्मक अन् कृतज्ञतायुक्त दृष्टीकोन !
‘नुकतीच एका वयस्कर साधकाची चौकशी केल्यावर कळले की, ‘ते पडल्याने त्यांच्या हाताला अस्थिभंग झाला आहे.’ त्या वेळी त्या साधकाने जवळच्या साधकांना सहजतेने सांगितले, ‘‘बरे झाले ! गुरुदेवांच्या कृपेमुळे एखादे मोठे संकट केवळ अस्थिभंगावर निभावले असेल !’ या साधकाने ‘जीवनात कितीही मोठ्या समस्या असल्या, तरी साधक सकारात्मक राहून आणि ईश्वराच्या अनुसंधानात राहून समस्येतून बाहेर पडू शकतो’, हे दाखवून दिले.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.१०.२०२१)