केरळमध्ये ‘हलाल’मुक्त रेस्टॉरंट उघडणार्या महिलेला अज्ञातांकडून मारहाण
रेस्टॉरंटची दुसरी शाखा उघडण्यास धर्मांधांचा विरोध
केरळमध्ये माकपचे सरकार असतांना एका महिला व्यवसायिकाला मारहाण होणे लज्जास्पद आहे ! आता याविषयी मानवाधिकारवाले आणि महिला संघटनावाले गप्प का आहेत ? – संपादक
एर्नाकुलम् (केरळ) – येथे ‘हलाल’ पदार्थ नसेलेले ‘नंदूज किचन’ नावाचे रेस्टॉरंट उघडणार्या तुशारा अजित या महिलेवर २५ ऑक्टोबर या दिवशी आक्रमण करून मारहाण करण्यात आली. तुशारा यांनी यावर्षी जानेवारी मासामध्येच हे रेस्टॉरंट उघडले होते. या रेस्टॉरंटमध्ये केवळ हलाल नसलेलेच पदार्थ मिळतात. त्यांनी बाहेर फलक लावून त्यात लिहिले आहे, ‘हलाल भोजन येथे प्रतिबंधित आहे.’ यामुळे अनेक मुसलमानांनी त्यांच्या रेस्टॉरंटवर आक्षेप घेतला होता. तुशारा या रेस्टॉरंटची दुसरी शाखा उघडणार होत्या. त्यामुळे त्यांना धर्मांधांकडून धमक्या मिळू लागल्या होत्या.
Lady who opened first-ever non-Halal restaurant in Kerala assaulted, was being threatened by Islamists against opening second branchhttps://t.co/yl4PmlG3ma
— OpIndia.com (@OpIndia_com) October 25, 2021
या आक्रमणाचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी ट्वीट करून निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, ही घटना तालिबानी कृती आहे. मी केरळच्या लोकांना ‘हलाल’वर बहिष्कार घालण्याचे आवाहन करतो.
Strongly condemn the attack against Smt.Thushara Ajith. A group of Muslim fanatics brutally attacked the woman entrepreneur due to non-compliance of Halal in her hotel. What happened in Kakkanad is nothing less than Talibanism. I urge the people of Kerala to reject #HalalInvasion
— K Surendran (@surendranbjp) October 25, 2021
‘हलाल’ म्हणजे काय ?‘झटका सर्टिफिकेशन अथॉरिटी’चे अध्यक्ष रवि रंजन सिंह यांनी सांगितले की, हिंदु, शीख आदी भारतीय धर्मांमध्ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्याची हत्या केली जाते. यामध्ये प्राण्याची मान एकाच वारमध्ये कापली जाते. यामुळे प्राण्याला अल्प प्रमाणात त्रास होतो. याउलट हलाल पद्धतीने प्राण्याच्या गळ्याची नस चिरली जाते आणि त्याला सोडून दिले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वाहते आणि नंतर त्या प्राण्याचा तडफडून तडफडून मृत्यू होतो. या प्राण्याचा बळी देतांना त्याचा तोंडवळा मक्केच्या दिशेने केला जातो. तसेच हे काम मुसलमानेतरांना दिले जात नाही. आज ‘मॅकडोनल्ड’ आणि ‘लिशियस’ यांसारखी आस्थापने केवळ हलाल मांसांचीच विक्री करत आहेत. तसेच अशा मासांपासून निर्माण केलेले पदार्थ विकले जातात. |