रुग्णालयातील सहकार्यांना सेवा अन् साधना यांचे महत्त्व सांगणार्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या (कु.) श्रिया साहा !
परात्पर गुरुदेवांना आत्मनिवेदन करतांना भावजागृती होणाऱ्या आणि रुग्णालयातील सहकार्यांना सेवा अन् साधना यांचे महत्त्व सांगणार्या कोलकाता येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या (कु.) श्रिया साहा !
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली साधना करण्यातच न्यून पडत असतांना सत्संगात आणखी काय विचारणार ?’, असा विचार मनात येणे
‘सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात येण्यापूर्वी मी विचार करत होते, ‘मी आश्रमातील सत्संगात काय विचारणार ?’ पुष्कळ चिंतन केल्यावर मनात एकच विचार यायचा, ‘आतापर्यंत गुरुदेवांनी साधनेच्या संदर्भात एवढे काही सांगितले आहे की, ते करण्यातच आम्ही न्यून पडतो, तर आणखी (साधनेच्या पुढील प्रयत्नांविषयी) काय विचारायचे ?’
२. प्रयत्नपूर्वक प्रार्थना केल्यावर यांत्रिकपणे वाटणे आणि डोळे बंद करून केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण केल्यास अंतर्मनातून आत्मनिवेदन होऊन भावजागृती होणे
काही वेळा ‘परात्पर गुरुदेवांना सर्वकाही ठाऊक आहे, तर त्यांना कोणती प्रार्थना करावी ?’, असा विचार मनात येतो. व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगात सांगतात की, ‘प्रार्थना वाढवा. संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही प्रार्थना वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’ मी प्रयत्नपूर्वक प्रार्थना करते, तेव्हा ती यांत्रिकपणे होते; परंतु कधी कधी मी डोळे बंद करून केवळ परात्पर गुरुदेवांचे स्मरण करते आणि त्यांना अनुभवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा अंतर्मनातून शब्दांविनाच आत्मनिवेदन होते आणि त्यातूनच माझी भावजागृती होते. त्या वेळी ‘गुरुदेवांशी शब्दांतून काही बोलण्याची आवश्यकताच वाटत नाही’, असे लक्षात येते.
३. सहकार्यांना साधिकेविषयी जाणवलेली सूत्रे
३ अ. सहकारी बाहेर इतर ठिकाणी जाण्याविषयी बोलावत असतांना त्यांना नकार देणे आणि ‘त्यांना साधिका व्यर्थ गोष्टी करण्यात वेळ वाया घालवणार नाही’, हे ठाऊक होणे : सहकारी कधी कधी बाहेर भोजन करण्यासाठी किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाण्यासाठी मला बोलवायचे; परंतु बहुतेक वेळा मी नकार द्यायचे. मी त्यांना सांगायचे, ‘‘मला काही सेवा आहेत आणि मला त्याला प्राधान्य द्यायचे आहे.’’ आता त्यांना ठाऊक झाले आहे की, ‘मी अनावश्यक गोष्टी करण्यात माझा वेळ वाया घालवत नाही. त्यामुळे आता तेसुद्धा मला कुठे जाण्यासाठी आग्रह करत नाहीत.’ आता त्यांना ‘मी कोणती साधना करते किंवा काय सेवा करते ?’, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असते. कधी चाकरी करतांना रिकामा वेळ असेल, तर ते मला अध्यात्म आणि साधना याविषयी काही सांगण्यास सांगतात किंवा त्यांच्या काही शंका असतात, तर त्यासुद्धा विचारतात.
३ आ. कोणाला भेट द्यायची असल्यास सहकार्यांना सात्त्विक वस्तू भेट देण्यास सांगणे : कोणाच्या वाढदिवसाला किंवा इतर वेळी काही भेट द्यायची असेल, तर मी सहकार्यांना सांगते, ‘काहीतरी सात्त्विक वस्तू द्यायला पाहिजे.’ सध्या त्यांना ते पूर्णपणे पटत नाही; परंतु मी सांगितल्यावर त्यांना या पैलूविषयी काहीतरी लक्षात येते आणि ‘पुढे त्यांना याविषयी जिज्ञासा निर्माण होऊ शकते’, असे मला वाटते. मला स्वतःला कोणाला काही भेट द्यायची असेल, तर मी त्या व्यक्तीची पातळी आणि आवड यांनुसार एखादा ग्रंथ भेट म्हणून देते.
४. सहकार्यांना ‘साधिका पुढे साधनाच करील’, याची कल्पना येणे
काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील माझे सहकारी (आधुनिक वैद्य) ‘पुढे काय करायचे ?’, याविषयी आपापसांत बोलत होते. एक म्हणाला, ‘‘कुठेतरी खाजगी व्यवसाय आरंभ करावा किंवा एखादे चिकित्सालय उघडायला हवे !’’ पुढे त्यांची चर्चा ‘मी पुढे काय करीन ?’, यावर चालू झाली. एक जण म्हणाला, ‘‘५ वर्षांनंतर मी श्रियाला चिकित्सालयात पहाणार नाही.
‘श्रिया चिकित्सालयामध्ये बसली आहे’, अशी कल्पनाच मी करू शकत नाही.’’ दुसर्या आधुनिक वैद्याने सांगितले, ‘‘मला वाटते की, श्रिया कुठेतरी सरकारी रुग्णालयात आरामात चाकरी करील.’’ तेव्हा तिसरा सहकारी म्हणाला, ‘‘५ वर्र्षांनंतर श्रिया आश्रमात सेवा आणि साधना करील.’’
– आधुनिक वैद्या (कु.) श्रिया साहा, कोलकता, बंगाल. (१९.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |