‘मी आणि माझे पती समीर दोघेही जन्माने हिंदु आहोत !’
समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे स्पष्टीकरण
मुंबई – मी आणि माझे पती समीर दोघेही जन्माने हिंदु आहोत. आम्ही धर्मांतर केलेले नाही. समीर यांचे वडीलही हिंदु असून त्यांनी मुसलमान महिलेशी लग्न केले होते. माझ्या सासूबाई हयात नाहीत. समीर यांचे आधीचे लग्न विशेष विवाह कायद्याच्या अंतर्गत झाले होते. वर्ष २०१६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. आम्ही हिंदु विवाह कायद्यानुसार वर्ष २०१७ मध्ये लग्न केले, अशी माहिती समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी सामजिक माध्यमांवर पाठवली आहे.