करवीर शिवसेनेच्या वतीने सनातन संस्थेच्या ‘शक्ति’ लघुग्रंथाचे १०० महिलांना वाटप !
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर), २५ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील मंगेश्वर मंदिरात करवीर शिवसेनेच्या वतीने घराघरात अध्यात्माचे ज्ञान पोचण्यासाठी सनातन संस्थेचा शक्ति हा लघुग्रंथ १०० महिलांना देण्यात आला. ‘ग्रंथामुळे देवीच्या संदर्भातील अमूल्य माहिती समजली’, असे मत काही महिलांनी ग्रंथ वाचून व्यक्त केले.
या वेळी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. महादेव चव्हाण, युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री. विनायक जाधव, युवासेना तालुकाप्रमुख श्री. संतोष चौगले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विजय गुळवे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, आबा जाधव, विभूते उपस्थित होते.