(म्हणे) ‘विजयासाठी भारतातील मुसलमानांच्या प्रार्थनाही पाठीशी होत्या !’
भारत-पाक क्रिकेट सामन्यात पाकच्या विजयावर पाकचे गृहमंत्री शेख रशिद यांचे विधान !
|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचे अभिनंदन आणि शुभेच्छा ! ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या संघाने भारताला मात दिली, त्याला मी सलाम करतो. हा इस्लामी जनतेचा विजय आहे. पाकिस्तानी संघ आणि मुसलमान बांधव यांनाही शुभेच्छा ! भारतातील मुसलमान बांधवांच्या प्रार्थनाही पाकिस्तानच्या संघाच्या समवेत होत्या. केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील मुसलमान बांधव पाकिस्तानी संघाच्या पाठीशी होते’, असे विधान पाकचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ ट्वीट करत केले आहे. २४ ऑक्टोबर या दिवशी दुबई येथे खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाक संघातील सामन्यात पाकचा १० गडी राखून विजय झाल्यावर त्यांनी हे विधान केले.
After Pakistan’s first-ever victory against India in the World Cup in 13 attempts, Pakistan Minister Sheikh Rasheed describes Pakistan’s victory against India in the T20 WC match as a "victory of Islam.”#IndiaVsPak #T20WorldCup pic.twitter.com/RvgGODiOHy
— News18 (@CNNnews18) October 25, 2021