केंद्रीय यंत्रणेने काम करतांना सर्वांना समान न्याय लावावा ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे – गेल्या १५ वर्षांत अनुमाने ६५ साखर कारखाने विकले गेले किंवा ते इतरांना चालवायला दिले गेले; मात्र त्याविषयी कुणी काहीच बोलत नाही, असा आरोप करत ‘केंद्रीय यंत्रणेने काम करतांना सर्वांना समान न्याय लावावा’, अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. विकलेल्या किंवा चालवायला दिलेल्या ६५ कारखान्यांपैकी ठराविकच कारखाने डोळ्यांसमोर ठेवून अपकीर्ती केली जात आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री ही पूर्णपणे कायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय यंत्रणांकडून होणार्‍या चौकशीतून वस्तूस्थिती समोर येईल. अपकीर्ती करण्यासाठी आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सध्या चालू आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.