गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय कार्यशाळेच्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती
रत्नागिरी – ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अंतर्गत ‘भारतीय इतिहास संशोधन मंडळ, देहली’ यांच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वाच्या आवश्यक गोष्टींमधून जातीयवादाचे धडे मिटवणे’, या विषयावर दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित रहाणार आहेत.
‘आझादी का अमृत महोत्सवा’च्या अंतर्गत देशभरात विविध विषयांवर जनजागृती आणि मार्गदर्शन विषयक विविध कार्यक्रम चालू आहेत. या अंतर्गत रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा २५ आणि २६ ऑक्टोबरला आयोजित केली आहे. या कार्यशाळेला गुरु घासीदास विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. अशोक मोडक, म. गांधी आंतरक्षत्रीय हिंदी विश्वविद्यालय कुलपती प्रा. रजनीश शुक्ला, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष रणजीत सावरकर, ‘आय्.सी.एच्.आर्.’चे सदस्य सचिव प्रा. कुमार रत्नम् आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.