सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत अकोला येथील भाजपच्या आमदारांच्या भेटी !
आमदार रणधीर सावरकर आणि आमदार गोवर्धन शर्मा यांचा कृतीशील प्रतिसाद
अकोला – येथील भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांची सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ अंतर्गत सनातनचे साधक श्री. श्याम राजंदेकर आणि श्री. धीरज राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांना सनातन संस्थेच्या ग्रंथांसंदर्भात माहिती देण्यात आली. या वेळी सावरकर यांनी २३६ ग्रंथ त्यांच्या निधीतून ग्रंथालयाला भेट म्हणून देण्याचे नियोजन केले. या प्रसंगी श्री. श्याम राजंदेकर यांनी त्यांना सनातन पंचांग २०२२ आणि ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ हा ग्रंथ भेट दिला.
सनातनचे साधक श्री. श्याम राजंदेकर आणि श्री. अजय खोत यांनी भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सनातन संस्थेच्या ग्रंथांविषयीची माहिती ऐकून आमदार शर्मा यांनी आमदार निधीतून २०० ग्रंथ ग्रंथालयाला भेट स्वरूप देण्याचे नियोजन केले. या वेळी श्री. श्याम राजंदेकर यांनी त्यांना सनातन पंचांग २०२२ भेट दिले.