कुठे ‘मनोलय आणि बुद्धीलय कसा करायचा ?’, हे शिकवणारा हिंदु धर्म, तर कुठे बुद्धीलाच सर्वश्रेष्ठ मानणारे बुद्धीप्रामाण्यवादी !
‘हिंदु धर्मात ‘प्रत्येक व्यक्तीचा उद्धार व्हावा’, या उद्देशाने नियम आणि कृती सांगितल्या आहेत. हे सर्व शास्त्र कोण्या व्यक्तीने सांगितलेले नसून विविध ग्रंथांमध्ये दिलेले आहे. कोणतीही कृती ‘धर्मशास्त्रप्रमाण’ असेल, तरच तिला हिंदु धर्माने मान्यता दिली आहे. याचे दैनंदिन जीवनातील सोपे उदाहरण म्हणजे ‘दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.’ हे कोणा व्यक्तीने सांगितलेले नाही; परंतु आजही बहुतेक सर्व हिंदू हा नियम पाळतात. धर्मशास्त्राने सांगितलेल्या अशा विविध कृतींतून मनुष्याचा मनोलय आणि बुद्धीलय होतो. त्यातूनच मनुष्याची आध्यात्मिक उन्नती होऊन तो जीवनमुक्त होतो.
सध्याचे बुद्धीप्रामाण्यवादी ‘संकुचित बुद्धी’लाच सर्वश्रेष्ठ समजत आहेत. त्यामुळे विविध बुद्धीअगम्य घटनांमध्ये त्याचे ‘का आणि कसे ?’, याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात आणि आयुष्यभर त्यातच अडकून जातात.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.१०.२०२१)
‘साधकांना मायेत रममाण असणार्या व्यक्तीच्या सहवासात रहायला आवडत नाही, तसेच देवाला साधना न करणार्या व्यक्तीच्या समवेत रहायला आवडत नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.१०.२०२१)