डाबर आस्थापनाच्या विज्ञापनातून करवा चौथ व्रताचा अश्लाघ्य अवमान
समलैंगिक महिला साजरा करत आहेत करवा चौथ !
हिंदूंच्या धार्मिक व्रतांचे अशा प्रकारे अवमान करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा कायदा नसल्याने सर्वांचेच फावते आहे. याकडे केंद्र सरकार कधी लक्ष देणार, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे ! – संपादक
नवी देहली – ‘डाबर’ आस्थापनाने त्याचे उत्पादन ‘गोल्ड ब्लीच’साठी (चेहरा उजळण्यासाठीचे उपाय) प्रसारित केलेल्या विज्ञापनातून एक समलैंगिक जोडपे त्यांचा पहिला ‘करवा चौथ’ हे व्रत साजरे करतांना दाखवले आहे. यात एक तरुणी दुसर्या तरुणीच्या चेहर्यावर ‘ब्लीच’ लावत आहे. तसेच या दोघी या सणाचे महत्त्व आणि त्यामागील कारण यांवर चर्चा करतांना दाखवण्यात आले आहे. या विज्ञापनावर सामाजिक माध्यमांतून टीका होऊ लागली आहे.
Dabur promotes lesbian Karwa Chauth, gets slammed by LGBT community for promoting ‘regressive’ ideas and producthttps://t.co/r43Q4HKTSL
— OpIndia.com (@OpIndia_com) October 23, 2021
‘करवा चौथ’ व्रत काय आहे ?
आश्विन मासातील कृष्ण पक्षात येणार्या चतुर्थीला ‘करवा चौथ’ व्रत केले जाते. ‘करवा’ म्हणजे मातीचा घट आणि ‘चौथ’ म्हणजे चतुर्थी. या दिवशी नवीन करवा आणून तो सजवला जातो. यानंतर पूजा करून याच करवातून चंद्राला अर्घ्य दिले जाते. करवा चौथ व्रत हे मुख्यत्वे करून सुवासिनी महिलांनी करावयाचे व्रत आहे. चांगला पती मिळावा, यासाठीही काही ठिकाणी कुमारिका हे व्रत करतात. करवा चौथ प्रामुख्याने उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून महिला व्रताचा संकल्प करतात. दिवसभर निर्जला व्रत (पाणी ग्रहण न करता केलेले व्रत) करून रात्री चंद्राचे दर्शन घेऊन, त्याचे पूजन करून त्याला अर्घ्य देतात आणि त्यानंतरच यजमानांच्या हातून पाणी ग्रहण करून व्रताची सांगता केली जाते. या व्रताचरणात सकाळी महादेव शिवशंकर, श्री पार्वतीदेवी, गणपति आणि कार्तिकेय यांचे पूजन केले जाते. याच दिवशी संकष्ट चतुर्थी असल्याने या व्रतातील गणपति पूजनाला वेगळे महत्त्व प्राप्त होते, असे सांगितले जाते.