रस्ते वाहन चालवण्यासाठी आहेत, नमाज पढण्यासाठी नव्हे !
गायक फाजील पुरीया यांच्याकडून सामाजिक माध्यमांवर विज्ञापन प्रसारित !
हिंदूंना रस्त्यावर फटाके न लावण्याचा उपदेश देणारे आमीर खान मुसलमानांना रस्त्यावर नमाज न पढण्याचा संदेश का देत नाही ? – संपादक
मुंबई, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘रस्ते हे नमाज पढण्यासाठी नव्हेत, तर वाहन चालवण्यासाठी आहेत’, असा संदेश देणारे विज्ञापन गायक फाजील पुरीया यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले आहे.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेते आमीर खान यांचे ‘सीएट’ आस्थापनाच्या ‘टायर’चे विज्ञापन प्रसारित झाले आहे. यामध्ये रस्त्यावर फटाके लावणार्या मुलांना ‘रस्ते गाडी चालवण्यासाठी असतात, फटाके लावण्यासाठी नाहीत’, असा संदेश दिला होता. हिंदूंच्या सणांच्या वेळी अशा प्रकारे उपदेश देण्यात येत असल्याविषयी हिंदूंकडून या विज्ञापनाविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर गायक फाजील पुरीया यांनी या विज्ञापनाचा संदर्भ घेऊन मुसलमान रस्त्यावर नमाज पडतात, याविषयी मुसलमान मुलांना मशिदीमध्ये नमाज पढण्याचा उपदेश दिला आहे.