पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी स्थानिक पक्षाकडून मोर्च्याचे आयोजन

मोर्चा काढून पाकव्याप्त काश्मीरला स्वातंत्र्य मिळू शकणार नाही, त्यासाठी तेथील नागरिकांनी पाकविरुद्ध सशस्त्र उठाव केला पाहिजे ! भारताला नेजाती सुभाषचंद्र बोस आणि क्रांतीकारक यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळाले होते, हा इतिहास आहे ! – संपादक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद येथे ‘युनायटेड कश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी’ने ७५ वर्षांपूर्वी पाकने जम्मू-काश्मीरमध्ये केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ मोर्चा काढला. या मोर्च्यामध्ये सहभागी झालेल्यांनी पाकव्याप्त काश्मीरला स्वातंत्र्य देण्याची मागणी घोषणांद्वारे केली, तसेच ‘पाक सैन्य आणि सरकार यांच्या कह्यातून पाकव्याप्त काश्मीर मुक्त करा’, अशी मागणी केली.

या संघटनेचे अध्यक्ष सरदार शौकत अली काश्मिरी म्हणाले की, २२ ऑक्टोबर १९४७ या दिवशी पाकिस्तानच्या आक्रमणात हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी येथील नीलम पूलावर मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. पाकिस्तान सहस्रो निरपराध लोकांचा मारेकरी आहे.