‘संजय गांधी निराधार योजने’च्या १५५ लाभार्थ्यांच्या पत्रांचे वाटप !
सांगली, २३ ऑक्टोबर – सांगली शहर कार्यक्षेत्रातील अपंग, निराधार, विधवा अशा विविध १५५ लाभार्थ्यांना २२ ऑक्टोबर या दिवशी ‘संजय गांधी निराधार योजने’च्या पत्रांचे वाटप करण्यात आले. या वेळी ‘संजय गांधी निराधार योजने’चे सदस्य आणि शिवसेनेचे भगवानदास केंगार, बिपिन कदम, आप्पासाहेब ढोले यांसह अन्य उपस्थित होते.