स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कोरोना झालेल्या महिलेची सर्वतोपरी काळजी घेणार्या सनातनच्या साधिका आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. अरुणा सिंह !
‘२५.६.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील संपादकीय सदरात प्रसिद्ध झाले होते, ‘काही वृद्धांना कोरोना झाला; म्हणून त्यांना त्यांच्या मुलांनी काळजी केंद्र (केअर सेंटर) किंवा ‘नर्सिंग होम’ यांत भरती केले; पण त्यांचा कोरोनाचा आजार बरा होऊनही त्यांची मुले त्यांना घरी न्यायला सिद्ध नाहीत.’
या पार्श्वभूमीवर मला सनातन संस्थेच्या साधिका आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. अरुणा सिंह यांची महानता लक्षात आली. त्यांच्या शेजारी रहाणार्या एका महिलेला कोरोना झाला होता. त्या महिलेचे सर्व नातेवाईक गावी आहेत. तेव्हा आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. अरुणा सिंह यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्या महिलेला रुग्णालयात नेले आणि ती बरी होईपर्यंत तिची काळजी घेतली. सध्या मुले कोरोना झालेल्या स्वतःच्या पालकांची काळजी घ्यायला सिद्ध नाहीत; पण रक्ताचे नाते नसूनही (डॉ.) सौ. अरुणा यांनी ज्या धैर्याने सामाजिक बांधीलकी जपली, ते पाहून मी भारावून गेले.
अशा साधकांना घडवणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती गीता प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०२१)