पुणे जिल्ह्यात भरदिवसा ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या शाखेवर दरोडा

२ कोटी ३१ लाख रुपयांची चोरी

भरदिवसा घडणारे चोरीचे वाढते प्रकार पहाता गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटत नाही, लक्षात येते ! पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस कधी सक्षम होणार ? असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आल्यास चूक ते काय ! – संपादक 

टाकळी हाजी (जिल्हा पुणे) – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या शाखेवर २१ ऑक्टोबर या दिवशी दुपारी दीड वाजता ५ दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत आणि बँकेच्या कर्मचार्‍यांना मारहाण करत अनुमाने २ कोटी रुपयांचे सोने अन् ३१ लाख रुपये रोख असा एकूण २ कोटी ३१ लाख रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले. या गाडीवर ‘प्रेस’चा मोठा फलक लावण्यात आलेला होता. या भागात अनेक वित्तीय संस्था आणि बँका कार्यरत असून त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.