बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी !
कागल (जिल्हा कोल्हापूर), २२ ऑक्टोबर (वार्ता.) – बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांडे घडवणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना २० ऑक्टोबर या दिवशी निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजेंद्र भोजे आणि श्री. राजू मेटे, बजरंग दलाचे श्री. विनायक आवळे, हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.
काश्मीर येथील हिंदूंच्या हत्या आणि सैनिकांचे हौतात्म्य यांच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान यांच्यातील ‘टी-२०’ क्रिकेट विश्वचषकातील सामना रहित करावा, या मागणीचे निवेदनही या वेळी देण्यात आले.