नगर येथील महापालिकेच्या मुख्य लेखाधिकार्याला २० सहस्र रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी अटक !
तळागाळात पसरलेली लाचखोरीची कीड मुळापासून नष्ट करण्यासाठी कठोर शिक्षेसह समाजाची नीतीमत्ता वाढवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे, तरच ही लाचखोरी वृत्ती संपुष्टात येऊ शकते !
नगर – येथील महापालिकेत मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर यांना ठेकेदाराच्या कामाचा धनादेश काढण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने २१ ऑक्टोबर या दिवशी अटक केली. तसेच त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका ठेकेदाराला महापालिकेत केलेल्या कामाची देयके संमत करून धनादेश देण्याच्या मोबदल्यात मानकर यांनी संबंधित ठेकेदाराकडे लाचेची मागणी केली होती.