आज पनवेल येथे सुप्रसिद्ध अभिनेते तथा लेखक शरद पोंक्षे यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम !
‘मी आणि नथुराम’ या पुस्तकाच्या ८ व्या आवृत्तीचे लोकार्पण होणार !
पनवेल – भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक सेल’च्या वतीने ‘संवादमाला पुष्प ३’ अंतर्गत प्रसिद्ध अभिनेते तथा लेखक शरद पोंक्षे यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम शनिवार, २३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक दीपक पळसुले हे त्यांची मुलाखत घेणार आहेत. या वेळी ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकाच्या ८ व्या आवृत्तीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून होणार्या या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून कार्यक्रमाचा प्रेक्षकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.