टपाल तिकिटांच्या किंमतीवर राष्ट्रभक्तांची किंमत ठरत नसते ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारे उर्जामंत्री नितीन राऊत यांचा हिंदु जनजागृती समितीकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे तीव्र निषेध !
मुंबई – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा वारंवार अपमान करणारे काँग्रेसचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध करते. वीर सावरकर यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने तत्कालीन काँग्रेसी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी टपाल तिकीट काढले; मात्र आज त्यांच्याच पक्षाचे मंत्री त्यावर टिप्पणी करून आपल्या नेत्यांचा अपमान करत आहेत. ‘जर इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिकिटापेक्षा माकडाच्या तिकिटाची किंमत अधिक ठेवली’, असे मंत्री महोदयांना म्हणायचे असेल, तर ‘काँग्रेसी संस्कृतीत आज देशभक्तांपेक्षा मर्कट उड्या मारणार्यांना अधिक महत्त्व का आले आहे’, हे त्यातून लक्षात येते. माननीय मंत्रीमहोदय, एखाद्या टपाल तिकिटाच्या किंमतीवर राष्ट्रभक्ताची किंमत ठरत नसते, याचे भान ठेवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
तिकिटांच्या किंमतीवर राष्ट्रभक्ताची किंमत ठरत नसते !!
…तसे असेल तर मग 15-20 पैशाच्या नाण्यांवर, तिकिटावर गांधी-नेहरूंचे चित्र आहे, मग तुमच्या मते त्या माकडाची किंमत त्यांच्यापेक्षाही अधिक आहे ?@NitinRaut_INC उत्तर द्याल का ?@NiteshNRane@RanjitSavarkar@SunainaHoley https://t.co/gRjZl6Qn6Q pic.twitter.com/29GfnXNaFk— 🚩 Ramesh Shinde 🇮🇳 (@Ramesh_hjs) October 22, 2021
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,
१. राष्ट्रभक्तांची किंमत जर टपाल तिकिटांवर ठरवायची झाली, तर स्व. इंदिरा गांधी यांच्या काळातच गांधीजींच्या टपाल तिकिटाची किंमत दीड आणा म्हणजे ९ पैसे; मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, कस्तुरबा गांधी यांच्या टपाल तिकिटांची किंमत १५ पैसे होती. त्या तुलनेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या टपाल तिकिटांची किंमत २० पैसे होती. यांतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची किंमत तत्कालीन काँग्रेसी नेत्यांपेक्षा अधिकच होती.
२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुलना माकडाशी करणार्या ऊर्जामंत्र्यांनी एकप्रकारे गांधी-नेहरूंच्या तिकिटांचीही तुलना माकडाशी केली आहे, हे त्यांच्या लक्षात येत आहे का ?
३. देशासाठी विशेष काही जमत नसेल, तर किमान स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आपल्या थोर क्रांतीकारकांचा आदर राखण्याएवढे सौजन्य तरी काँग्रेसी नेत्यांमध्ये असले पाहिजे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध ठाम राहून स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात शिक्षा भोगण्यासाठी गेले; मात्र येथे मंत्री महोदय स्वतःच्या ट्वीटविषयीही ठाम रहाण्याचे धाडस दाखवत नाहीत. त्यामुळेच त्यांनी ते ट्वीट लगेच ‘डिलीट’ करून (पुसून) पळ काढला. मग कोण पळपुटे निघाले ?
‘ट्विटर’वर अवमानकारक ट्वीट करून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान !’ ही बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! |