हिंदुविरोधी अभिनेत्यांचा एक गट नेहमीच हिंदूंच्या भावना दुखावतो ! – भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे
हिंदुविरोधी विज्ञापनामुळे हेगडे यांचे सिएट टायर आस्थपनाला पत्र
|
बेंगळुरू (कर्नाटक) – चित्रपट अभिनेते आमीर खान यांनी ‘सिएट’ टायरच्या एका विज्ञापनाद्वारे लोकांना रस्त्यावर फटाके न फोडण्याचा सल्ला दिला आहे. यावर भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी आक्षेप घेत आमीर खान यांच्यावर टीका केली आहे.
BJP MP claims an advertisment featuring #AamirKhan, discouraging the use of firecrackers has hurt Hindu sentiments https://t.co/BVrrTHx4rH
— Zee News English (@ZeeNewsEnglish) October 21, 2021
खासदार हेगडे यांनी या प्रकरणी आस्थापनाने व्यवस्थापकीय संचालक आणि विशेष कार्यकारी अधिकारी अनंतवर्धन गोएंका यांना पत्र पाठवत या विज्ञापनाची नोंद घेण्याची विनंती केली आहे. ‘आजकाल हिंदुविरोधी अभिनेत्यांचा एक गट नेहमीच हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करत असतो; मात्र हे अभिनेते कधीही स्वतःच्या समाजाच्या चुकीच्या कृत्यांवर भाष्य करत नाहीत’, असेही त्यांनी यात म्हटले आहे.
या पत्रात अनंत हेगडे यांनी लिहिले आहे की,
१. आमीर खान लोकांना गल्ल्यांमध्ये फटाके न फोडण्याचे आवाहन करत आहेत, असे तुमच्या आस्थापनाचे नवे विज्ञापन चांगला संदेश देणारे आहे. या समस्येवर तुम्ही व्यक्त केलेल्या चिंतेविषयी कौतुक करायला हवे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला आणखी एक समस्या मांडण्याची विनंती करतो. ती म्हणजे शुक्रवार आणि मुसलमानांच्या इतर सणांच्या दिवशी त्यांनी नमाजच्या नावाने रस्ते बंद करणे, हे होय. तसेच अजानाच्या वेळी मशिदींमधून होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या समस्येवरही तोडगा काढला पाहिजे.
२. या ध्वनीप्रदूषणामुळे रुग्ण, वृद्ध, शिक्षक आदींना त्रास सहन करावा लागतो. रस्ते बंद केल्याने रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाच्या गाड्यांना अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे गंभीर हानी होते.
३. आपण जनतेला भेडसावणार्या समस्यांच्या विषयी संवेदनशील आहात आणि तुम्ही हिंदु आहात. त्यामुळे मला अपेक्षा आहे की, हिंदूंना गेल्या अनेक शतकांपासून केल्या जाणार्या भेदभावाची तुम्हाला जाणीव असेल. यामुळेच आस्थापनाच्या विज्ञापनामुळे हिंदूंमध्ये रोष निर्माण झाला आहे. मला आशा आहे की, तुम्ही हिंदूंच्या भावनांचा सन्मान कराल.
Uttara Kannada M.P Shri Ananth Kumar Hegde has sent a letter to Mr Ananth Vardhan Goenka,M.D &CEO of @CEATtyres to showcase a advertisement of people blocking the roads for prayers. And also to stop aying with Hindu Sentiments.🙏🕉 pic.twitter.com/DauQT8Fo0X
— Adarsh Hegde (@adarshahgd) October 20, 2021