नोएडा (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांच्या धार्मिक मिरवणुकीमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !
हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निदर्शने करत पोलिसांकडे अटकेची मागणी
अशी मागणी का करावी लागते ? अशा घटनांच्या वेळी पोलीस कुठे असतात ? त्यांना या घोषणा ऐकू येत नाहीत का ? पोलीस बहिरे आणि आंधळे आहेत का ? उद्या अशांनी आक्रमणे केली, तरी पोलीस झोपलेलेच असणार आहेत का ? – संपादक
नोएडा (उत्तरप्रदेश) – येथे मुसलमानांकडून ‘बारावफात’ या धार्मिक उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याची घटना समोर आली आहे. ‘बारावफात’ या दिवशी प्रेषित महंमद पैगंबर यांचा जन्म झाला आणि याच दिनांकाला त्यांचा मृत्यूही झाला. या मिरवणुकीमध्ये शेकडो लोकांचा सहभाग होता. त्यांच्या हातात चांदतारा असलेले झेंडे होते. या घोषणाबाजीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे. याची माहिती मिळाल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मोर्चा काढून येथील सेक्टर २० पोलीस ठाण्याला घेराव घालून संबंधितांना अटक करण्याची मागणी केली. जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत निदर्शने थांबवणार नाहीत, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दिली.